Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना नाट्यपरिषदेचा जीवनगौरव

मुंबई ः आपल्या अभिनयाची अमीठ छाप उमटवणारे हुनहनुरी कलाकार म्हणून ओळख असलेले आणि नुकताच महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेते अशोक सराफ यांना नाट्यपरिषद

मनपा करणार एका प्रभागात मीटरद्वारे पाणीपुरवठा ; यंदाचे अंदाजपत्रक 802 कोटींचे, नवी करवाढ नाही
नक्षलग्रस्त भागातील युवकांना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने आणले शिक्षणाच्या प्रवाहात
गुगल ड्राईव्हमधून आपोआप डेटा डिलीट; कंपनीचा यूजर्सना इशारा

मुंबई ः आपल्या अभिनयाची अमीठ छाप उमटवणारे हुनहनुरी कलाकार म्हणून ओळख असलेले आणि नुकताच महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेते अशोक सराफ यांना नाट्यपरिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाली आहे. अभिनेते अशोक सराफ यांच्यासोबतच अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना देखील यंदाचा अखिल भारतीय नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. नाटक, चित्रपट असो वा मालिका प्रत्येक माध्यमातून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाल्यानंतर यांच्यावर वेगवेगळ्या स्तरांतून अभिनंदनाच वर्षाव होत आहे. अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांनी नेहमीच प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. मराठी सिनेसृष्टी सोबतच त्यांनी हिंदीतही आपले नाव गाजवले. केवळ विनोदीच नव्हे तर, त्यांच्या गंभीर आणि नकारात्मक भूमिकांना देखील चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अशोक सराफ यांनी आपल्या वेगवेगळ्या भूमिकांमधून नेहमीच प्रेक्षकांचे मन जिंकले. अशोक सराफ यांचं मराठी मनोरंजन विश्‍वातील हे कलात्मक योगदान अगदीच अभिमानस्पद आहे. तर, ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनीही मनोरंजन विश्‍वाची कित्येक वर्ष गाजवली. इतकेच नाही, तर त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील स्वतःचा ठसा उमटवला. त्यांच्या ‘गांधी’ या चित्रपटाला बाफ्टा पुरस्कार देखील मिळाला होता. गेली चार ते पाच दशके प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणार्‍या रोहिणी हट्टंगडी आजही तितक्यातच उत्साहाने पडद्यावर वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसतात. नाटक, चित्रपट, मालिका अशा तीनही माध्यमातून रोहिणी हट्टंगडी नेहमी प्रेक्षकांच्या भेटीला येतात. मराठी मनोरंजन विश्‍वातील हे दोन्ही कलाकार गेली अनेक वर्ष नाट्यसृष्टीची सेवा करत आहेत. या पुरस्काराच्या निमित्ताने त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांच्या कारकीर्दीचा सन्मान करण्यात येणार आहे. 14 जून रोजी या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

COMMENTS