Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीगोंद्यात वीज नसल्याने संभाजी ब्रिगेड आक्रमक

सहायक अभियंत्याला बेशरमच्या पानाचा घातला हार

श्रीगोंदा : श्रीगोंदा शहरात 24 तासांपासून वीज नसल्यामुळे संभाजी ब्रिगेडने आक्रमक पवित्रा घेतला. श्रीगोंदा शहरांमध्ये दोन दिवसापूर्वी वादळी पाऊस झ

युती किंवा आघाडी करू… पण, यापुढे संभाजी ब्रिगेड एकत्रित निवडणूक लढवणार…
संभाजी ब्रिगेडचे 22 ऑगस्टला मुंबईत अधिवेशन
संभाजी ब्रिगेडच्या वतीने बळी महोत्सवाचे आयोजन

श्रीगोंदा : श्रीगोंदा शहरात 24 तासांपासून वीज नसल्यामुळे संभाजी ब्रिगेडने आक्रमक पवित्रा घेतला. श्रीगोंदा शहरांमध्ये दोन दिवसापूर्वी वादळी पाऊस झाल्याने परिसरात तारा तुटल्याने अक्षरशा श्रीगोंदा शहरात 24 तास लाईट गायब नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. तसेच श्रीगोंदा शहरातील बालाजी नगर, हनुमान नगर परिसरात तीन दिवस अंधारात नागरिकांना काढावे लागले. त्यामुळे हनुमान नगर, बालाजी नगर परिसरातील ज्येष्ठ नागरिक महावितरणच्या ऑफिससमोर ठाण मांडून बसले होते. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे हे सहकार्यांबरोबर महावितरण ऑफिसमध्ये गेले असता त्या ठिकाणी महावितरणचे ऑफिस बंद असल्याने संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आक्रमक झाले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष नाना शिंदे यांनी सहायक अभियंता कावरे यांना बेशरम वनस्पतीचा पानाचा हार घालून उपहासात्मक सत्कार केला तसेच बालाजी नगर हनुमान नगर येथील जेष्ठ नागरिकांनी जाब विचारला. वेळेत लाईट का देऊ शकत नाही, आमचे हाल होत आहेत. आम्ही जेष्ठ नागरिक असल्याने आमचे हाल होत आहेत. असा जाब विचारला. यात सुधारणा न झाल्यास संभाजी ब्रिगेड येत्या काळात तीव्र आंदोलन असा इशारा त्यांनी दिला आहे. यावेळी उपस्थितांमध्ये नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष प्रसाद काटे संभाजी ब्रिगेडचे जिल्हा संघटक गणेश पारे सागर हिरडे जिल्हा उपाध्यक्ष नाना शिंदे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे तसेच हनुमान नगर बालाजी नगर परिसरातील असंख्य ज्येष्ठ नागरिक व तरुण उपस्थित होते. 

COMMENTS