Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवरात्रोत्सव संपताच कांदा कडाडला

मुंबई : नवरात्रोत्सव म्हटला की, उपवासाचे दिवस. त्यामुळे कांदा, लसूनसारख्या पदार्थांना मागणी कमी असते. मात्र नवरात्रोत्सव संपताच पुन्हा एकदा कांद्

मिताली राजच्या आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा
बीड तालुक्यात तरुण शेतकर्‍याची आत्महत्या
“लगन”चित्रपटाचा मोशन पोस्टर प्रदर्शित (Video)

मुंबई : नवरात्रोत्सव म्हटला की, उपवासाचे दिवस. त्यामुळे कांदा, लसूनसारख्या पदार्थांना मागणी कमी असते. मात्र नवरात्रोत्सव संपताच पुन्हा एकदा कांद्याचे दर वाढतांना दिसून येत आहे. मुंबईसह राज्यातील बहुतेक शहरांमध्ये कांद्याच्या भावाने अर्धशतकी मजल मारली आहे. त्यामुळे गृहिणींची चिंता वाढली आहे.
काही महिन्यांपूर्वी टोमॅटोच्या महागाईने सर्वसामान्यांना अक्षरश: मेटाकुटीला आणले होते. टोमॅटोचा भाव स्थिरावल्यानंतर कांद्याच्या भावाने उचल खाल्ली. नवरात्रीच्या दिवसात कांदा खाणे टाळले जाते. बहुतेक हिंदू कुटुंबांमध्ये या 9 दिवसांत जेवणात लसूण आणि कांदा वापरला जात नाही. तसेच, मासांहरही वर्ज्य केला जातो. त्यामुळे कांद्याचा वापर कमी होतो. त्यामुळे नवरात्रीच्या आधी कांद्याचा भाव काहीसा खाली आला होता. मात्र, आता पुन्हा एकदा कांद्याचा भाव वधारू लागला आहे. त्यामुळं साठेबाजी वाढून भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. मुंबईत कांद्याचा भाव किलोमागे 45 ते 55 रुपयांदरम्यान आहे. वर्धा शहरात हाच भाव 60 रुपये आहे. कोल्हापूर शहरात कांदा प्रतिकिलो 40 रुपयांपर्यंत विकला जात आहे. एका वेळी तीन किलो घेतल्यास किलोमागे 35 रुपये मोजावे लागत आहेत. तर, पुण्यात कांदा प्रति किलो 45 रुपयांना विकला जात आहे. केंद्रीय ग्राहक मंत्रालयाच्या संकेतस्थळावरील ताज्या आकडेवारीनुसार, कांद्याची किरकोळ किंमत किलोमागे जास्तीत जास्त 70 रुपये तर, कमीत कमी 17 रुपये आहे. राजधानी दिल्लीच्या किरकोळ बाजारात कांदा 60 रुपये किलोवर पोहोचला आहे. मात्र, दिल्ली, त्रिपुरा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीरमध्ये कांद्याची सरासरी किंमत 40 रुपये आहे. ईशान्येकडील नागालँड आणि सिक्कीममध्ये 50 रुपये आणि मिझोराम आणि अंदमानमध्ये 55 रुपयांवर पोहोचला आहे.

COMMENTS