Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मखमलाबाद परिसरात तब्बल तीन बिबटे ; नागरीकांमध्ये दहशत 

नाशिक प्रतिनिधी - पंचवटीतील मखमलाबादजवळील वडजाईमाता नगरात एकाच वेळी तीन बिबट्यांचा मुक्त संचार सुरू असल्याचे उघड झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वा

दैव बलवत्तर म्हणून बिबट्यापासून वाचला जीव
Sangamner : धांदरफळ खुर्द मध्ये बिबट्याचे दर्शन (Video)
जुन्नरमध्ये बिबट्याला जेरबंद करण्यात यश

नाशिक प्रतिनिधी – पंचवटीतील मखमलाबादजवळील वडजाईमाता नगरात एकाच वेळी तीन बिबट्यांचा मुक्त संचार सुरू असल्याचे उघड झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी बिबट्याने घोड्याच्या शिंगरुला मारले होते. रात्री कुत्र्यांवर हल्ला केला. स्थानिकांनी फटाके फोडून बिबट्यांना पळविण्याचे प्रयत्न केले. मात्र गुरुवारी सकाळी पुन्हा बिबट्या दिसला. या घटनाक्रमाने परिसरात भीती आहे. सकाळी घराबाहेर पडण्यास कुणी धजावत नाही. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी या भागात आधीपासून दोन पिंजरे लावण्यात आले आहेत. आता आणखी एक पिंजरा लावला जात असल्याचे वन विभागाने म्हटले आहे.

मखमलाबाद हा निवासी वस्ती, द्राक्षबागा, शेतमळ्यांचा परिसर आहे. याआधी परिसरात अनेकदा बिबट्यांचे दर्शन घडले आहे. बुधवारी रात्री मात्र एकाच वेळी तीन बिबटे नागरी वस्तीत शिरल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. वडजाईमाता नगरात माजी महापौर अशोक मुर्तडक यांची शेती आहे. या शेतीला लागून असणाऱ्या नाल्यातून रात्री बिबटे नागरी वसाहतीत आले. बांधकाम सुरू असलेल्या एका प्रकल्पाच्या रेतीवर त्यांनी डेरा टाकला. अंधारात कामगारांना प्रारंभी ती कुत्री असल्याचे वाटले. काही वेळात बिबटे असल्याचे लक्षात आल्यावर संबधितांनी पत्र्याच्या खोल्यांमध्ये धाव घेत आसपासच्या रहिवाश्यांना सावध केले. आरडाओरड झाल्यामुळे बिबटे पळाले. एका कुत्र्यावर त्यांनी झडप टाकली. नागरिकांनी सर्वांना सावध केले. फटाके फोडून बिबट्यांना पळवण्याचा प्रयत्न झाला. ते कुठे अंतर्धान पावले हे स्पष्ट झाले नाही, असे भावांजली सोसायटीत राहणारे भूषण पवार यांनी सांगितले.

COMMENTS