Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अरूणकुमार मुदंडा यांची पत्रकारिता विधायक आणि कल्याणकारी

वृत्तपत्रातील एक बातमी काल अनेकांचे लक्ष वेधून घेत होती. मुंबईतील सीएसटी परिसरातील पत्रकार भवनात पार पडलेल्या पुरस्कार वितरणाच्या सोहळ्यात ‘मुंबई

कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे 14.52 कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन
राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या जिल्हा सचिवपदी नितीन खंडागळे
शुक्राचार्य मंदिर सेवकांचा कामगार दिनी सन्मान

वृत्तपत्रातील एक बातमी काल अनेकांचे लक्ष वेधून घेत होती. मुंबईतील सीएसटी परिसरातील पत्रकार भवनात पार पडलेल्या पुरस्कार वितरणाच्या सोहळ्यात ‘मुंबई मराठी पत्रकार संघा’ने छत्रपती संभाजीनगर येथील संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार अरुणकुमारजी मुंदडा यांना विशेष सन्माननीय आजीवन सदस्यत्व बहाल केले. घटना छोटीशी जरी असली तरी तिने मराठवाड्यातील पत्रकार जगताला आश्‍चर्याचा सुखद धक्का दिला.
अरुणकुमार मुंदडा हे छत्रपती संभाजीनगर येथील अत्यंत आदरणीय व ज्येष्ठ पत्रकार आहेत. पत्रकारिता ही त्यांच्यासाठी केवळ एक व्यावसायिक कारकीर्द नाही, तर समाजाची सेवा करण्याचे एक साधन आहे. अरूणकुमारजी छत्रपती संभाजीनगरातून दोन वृत्तपत्रे चालवतात. गेली 45 वर्ष ते पत्रकारितेच्या क्षेत्रात अहर्निशपणे कार्यरत आहेत. मराठवाडा, अजिंठा, सार्वमत, गावकरी, लोकधर्म, नवा मराठा, सांजवार्ता, पोलीस टाईम्स, तरुण भारत आदी अनेक वृत्तपत्रातून त्यांनी पत्रकार म्हणून काम केलेलं आहे. राष्ट्रीय पातळीवरील अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्या ‘टाइम्स’ समूहाच्या वृत्तपत्रातूनही त्यांनी पत्रकारिता केलेली आहे. त्यांची पत्रकारिता ही विधायक आणि कल्याणकारी मार्गाने गेली. तिला कधी अहंकाराचा वारा शिवला नाही, की तिने कधी उथळ पाण्यासारखा खळखळाट केला नाही. म्हणूनच थोडी नव्हे तर चार तपे तिनं पूर्ण केलेली आहेत. अरुणकुमार मुंदडा यांच्या पत्रकारितेचा प्रवास हा एका प्रेरणादायी कार्यकर्त्याचा प्रवास आहे. त्यांनी आपल्या लेखणीतून समाजाच्या समस्यांना वाचा फोडली आहे आणि त्यांच्यासाठी निरपेक्ष व निःस्वार्थपणे कार्य केले आहे. त्यांच्या कार्याची प्रतिष्ठा आणि आदर हे केवळ त्यांच्यासाठीच नाही, तर संपूर्ण पत्रकारितेच्या क्षेत्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे. वयाच्या बहात्तरितही दोन दोन वृत्तपत्रे चालवणं, राजकीय आणि सामाजिक घटनांचं भान ठेवून संपादन करणे, त्यासाठी शेकडो मैलांचा प्रवास करणे, पैठण, छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई सारख्या भागात इतकी वर्ष वृत्तपत्रीय पत्रकारितेत टिकून राहणं, हीच खूप मोठी तपश्‍चर्या आहे. असे असले तरीही मराठवाड्यातील पत्रकारितेची दखल मुंबई मराठी पत्रकार संघाचे विद्यमान अध्यक्ष श्री.नरेंद्र पाटील वाबळे यांनी घेतली, याचे अनेकांना आश्‍चर्य वाटले आणि आनंदही झाला. कारण ही निवड म्हणजे तो मराठवाड्याचा बहुमान समजला गेला. भारतात ज्या काही पत्रकार संघटना आहेत, त्यात मुंबई मराठी पत्रकार संघाचा नावलौकिक आणि प्रतिष्ठा खूप मोठी आहे. 83 वर्षाचा प्रदीर्घ व प्रतिभाशाली वारसा लाभलेली ही एकमेव पत्रकार संघटना आहे. 1941 मध्ये इतिहास संशोधक आणि पत्रकार स्वर्गीय न. र. फाटक यांनी या संस्थेची स्थापना केली. पत्रकार संघाचे पहिले अध्यक्षपद त्यांनी भूषवले. श्री.य.कृ. खाडिलकर, श्री.ताम्हणकर, श्री.श. नवरे, श्री. आप्पा पेंडसे, श्री.प्रभाकर पाध्ये, श्री.नीलकंठ खाडिलकर, श्री.विश्‍वनाथ वाबळे आणि श्री.नारायण आठवले अशा तत्कालीन महाराष्ट्रातील नामांकित पत्रकार मंडळींनी आतापर्यंत पत्रकार संघाचे अध्यक्षपद भूषवून पत्रकार संघाचा नावलौकिक आणि प्रतिष्ठा कायम राखलेली आहे. आपल्या निर्भीड  आणि निरपेक्ष पत्रकारितेमुळे मुंबई मराठी पत्रकार संघाचा राजकारण्यांमध्ये सुद्धा वचक आहे.त्याच एक उदाहरण सांगतो, सन 1980 मध्ये बिहार विधानसभेमध्ये परखड आणि निर्भीड पत्रकारितेची मुस्कटदाबी करणारा एक काळा कायदा पास झाला होता. त्याविरोधात मुंबई मराठी पत्रकार संघानं कणखर भूमिका घेऊन जोरदार विरोध केला. शेवटी बिहार सरकारला तो कायदा मागे घ्यावा लागला. आज संघाच्या अध्यक्षपदासारख्या जबाबदारीच्या पदावर सध्या ‘शिवनेर’ या लोकप्रिय दैनिकाचे संपादक श्री.नरेंद्र पाटील वाबळे विराजमान आहेत. पत्रकारितेसारख्या गढूळलेल्या क्षेत्रात असूनही मनानं आणि व्यवहारानं स्फटिकासारखं निर्मळ असलेल्या नरेंद्र वाबळे पाटलांचं नातं पायाखालील मातीशी घट्ट जोडलेलं आहे. प्रसिद्धीची हवा नाका तोंडात शिरलेली मुंबा नगरीतील अनेक स्वयंघोषित पत्रकार मंडळी जमिनीच्या वरून चार बोटं चालतात.अशी हवा नरेंद्र वाबळे पाटलांना अजून बाधलेली नाही. उलट अडल्या नडलेल्या आणि अन्यायग्रस्त पत्रकारांना त्यांनी नेहमीच मदतीचा हात दिला आहे.सरकारी मानधन आता आलं, त्यांनी काही वर्षांपूर्वीच पत्रकार संघाच्या वतीने ज्येष्ठ पत्रकारांना मानधन सुरू केलेलं आहे. पत्रकारितेतील अनेक अनिष्ट गोष्टींना त्यांनी पायबंद घातलेला आहे. आणि आता तर कोट्यावधी रुपये खर्चून पत्रकार संघाची नवीन सर्व सुविधायुक्त अद्यावत इमारत मुंबईत उभी राहत आहे. अतिशय स्निग्ध आणि निर्गवी व्यक्तिमत्वाच्या नरेंद्र वाबळे पाटलांची ही सारी करामत आहे. मागच्या महिन्यात बांद्रा येथील रंगशारदा हॉटेलच्या सभागृहात झालेल्या एका सन्मानसोहळ्यात मी नरेंद्र पाटलांचं अमोघ वक्तृत्व अनुभवलं आहे. त्यांच्या शब्दातील ताकद मी तेव्हाच जोखली होती. नरेंद्र पाटील वाबळे यांच्या पत्रकारितेचा प्रवास हा ऊर्जादायी आणि प्रेरणादायी आहे. त्यांनी आपल्या लेखणीतून समाजाच्या समस्यांना वाचा फोडली आहे आणि त्यांच्यासाठी निरपेक्ष व निःस्वार्थपणे कार्य केले आहे. त्यांच्या कार्याची प्रतिष्ठा आणि आदर हे केवळ त्यांच्यासाठीच नाही, तर या क्षेत्रात करिअर करू इच्छिणार्‍या नवं पत्रकारांसाठी एक आदर्श आहे. आचार्य प्र. के. अत्रे, अग्रलेखाचा बादशाह नीलकंठ खाडिलकर असे आमच्या देव्हार्यातील प्रतिभावंत ज्या मुंबई मराठी पत्रकार संघाचे सदस्य होते, त्या संघाबद्दल आमच्या मनात नीतांत आदर आहे. मित्रवर्य ज्येष्ठ पत्रकार व संपादक अरुणकुमारजी मुंदडा यांना या संघाचं विशेष सन्माननीय सदस्य देऊन नरेंद्र वाबळे पाटलांनी मराठवाड्याचा जो गौरव केला आहे, त्यामुळे हा आदर आता द्विगुणीत झाला आहे. अरुणकुमारजींचं अभिनंदन! आणि मुंबई मराठी पत्रकार संघाचे मन:पूर्वक आभार!!

लेखक ः मिलिंद काटे
लेखक आणि प्रकाशक,
शेवगाव जि. अहमदनगर 9423455272 

COMMENTS