Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कला कधीच उपाशी राहू देत नाही : प्रा.  सोनवणे

श्रीगोंदा  : माणसाला कला कधीच उपाशी राहू देत नाही असे प्रा.राम सोनवणे यांनी केले आहे. ते श्रीगोंदा तालुक्यातील चांडगाव येथे सावित्रीबाई फुले विद्य

श्रीगोंदा-टाकळी कडेवळीत रस्ता दुरुस्त करा
अर्धवट महामार्ग कामामुळे ग्रामस्थ संतप्त; आंदोलन तीव्र
विकास कामांमध्ये महिला अव्वलस्थानी- डॉ. प्रतिभाताई पाचपुते

श्रीगोंदा  : माणसाला कला कधीच उपाशी राहू देत नाही असे प्रा.राम सोनवणे यांनी केले आहे. ते श्रीगोंदा तालुक्यातील चांडगाव येथे सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत श्रीगोंदा येथील महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय आयोजित केलेल्या राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत हिवाळी विशेष श्रमसंस्कार शिबीरात “मनोरंजनातून प्रबोधन” या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा.सोनवणे बोलत होते.

प्रा.सोनवणे यांनी १९ हुबेहूब पशुपक्ष्यांचे आवाज काढत पशुसंवर्धन ही काळाची गरज असल्याचे पटवून दिले.१२अधिक दोन स्तारावर या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रसाळ तर प्रमुख पाहुणे म्हणून चांडगावचे सरपंच रविंद्र म्हस्के होते.हे श्रमसंस्कार शिबीर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ भाऊसाहेब बुलाखे,प्रा. डॉ.देवेंद्र बहीरम,प्रा.संजय फटे.प्रा. प्राध्यापिका कल्पना बागुल,प्रा. श्रध्दा जवळकर हे अधिक परिश्रम घेत आहेत.प्रा.सोनवणे पशुपक्ष्यांच्या हुबेहूब आवाजाने सर्व विद्यार्थी, विद्यार्थीनी यांची मने जिंकली. उपस्थितांचे आभार हिरडे यांनी मानले.

COMMENTS