Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दर्शन रोटरी नेत्र रुग्णालयात सुसज्ज मशिनरीचे आगमन

संगमनेर ः गोरगरीब रुग्णांच्या डोळ्यांची मोफत तपासणी व शस्त्रक्रिया करणार्‍या दर्शन रोटरी नेत्र रुग्णालयात आता अत्याधुनिक मशिनरीची भर पडली आहे. रो

अनिल पावटे यांना उत्कृष्ट अध्यापन व साहित्य सेवा पुरस्कार
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला 200 जागांवर आघाडी
घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी झाली बालाजीरायांची व हनुमंतरायाची भेट….

संगमनेर ः गोरगरीब रुग्णांच्या डोळ्यांची मोफत तपासणी व शस्त्रक्रिया करणार्‍या दर्शन रोटरी नेत्र रुग्णालयात आता अत्याधुनिक मशिनरीची भर पडली आहे. रोटरी क्लब ऑफ संगमनेर या सेवाभावी संस्थेअंतर्गत हे रुग्णालय चालविले जाते. जागतिक दर्जाच्या अल्कॉन कंपनीचे अमेरिकन तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी हि मशीनरी असणार आहे.
प्रसिद्ध उद्योजक व मालपाणी उद्योग समूहाचे प्रमुख राजेश मालपाणी यांचे शुभहस्ते या मशिनरीचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले.  नगर जिल्ह्यात अशी सुसज्ज मशिनरी रुग्णांसाठी पहिल्यांदाचा उपलब्ध होणार असून या मशिनरीची किंमत सुमारे 37 लाख रुपये असल्याची माहिती रुग्णालय ट्रस्टचे अध्यक्ष सीए संजय राठी यांनी दिली. अल्कॉन कंपनीच्या या मशिनचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये ओझल ही पेटंट टेक्नॉलॉजी वापरण्यात आली असून या मशिनद्वारे करण्यात आलेल्या शस्त्रक्रियाचा रुग्णांना तसेच डॉक्टरांना सुद्धा लाभ होणार आहे. जलद व अचूक शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टरांना मदत मिळणार असून शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना या तंत्रज्ञानाद्वारे लवकर आराम मिळणार आहे अशी माहिती ट्रस्टी रो. दिलीप मालपाणी यांनी दिली. संगमनेर अकोले तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेरील रुग्णांसाठी दर्शन रुग्णालयाने आतापर्यंत अतिशय उच्च दर्जाची सेवा दिली आहे. रुग्णालयामार्फत आतापर्यंत सुमारे 27 हजार मोफत मोतिबिंदु शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून याचा लाभ समाजातील गोरगरीब वर्ग, तसेच दुर्गम भागातील रुग्णांनी घेतला आहे. या मशिनवर ऑपरेशन व्हावे यासाठी आधी रुग्णांना बाहेरील जिल्ह्यांत जावे लागत होते परंतु आता त्याच दर्जाची शस्त्रक्रिया संगमनेरमध्ये होणार असल्याची माहिती राठी यांनी दिली तसेच जास्तीत जास्त रुग्णांनी या नवीन तंत्रज्ञानाद्वारे शस्त्रक्रियेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. साईनाथ साबळे, ट्रस्टचे सेक्रेटरी रो. संजय लाहोटी व सर्व ट्रस्टी तसेच रोटरी सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रो. अजित काकडे यांनी केले तर आभार रो. आनंद हासे यांनी मानले.

COMMENTS