Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चिखली (नाथ) येथे कृषिदूतांचे आगमन

आष्टी प्रतिनिधी - पाटोदा तालुक्यातील चिखली (नाथ) येथे आष्टी तालुका येथील श्री छत्रपती शाहू, फुले, आंबेडकर, कृषी महाविद्यालयातील चतुर्थ वर्षातील व

मन, आचरण शुध्द तरच कामही शुध्द : अजिनाथ हजारे
सैन्य भरतीच्या अमिषाने फसवणूक
‘पीएम किसान’, ‘नमो शेतकरी’साठी साडेतेरा लाख शेतकरी पात्र

आष्टी प्रतिनिधी – पाटोदा तालुक्यातील चिखली (नाथ) येथे आष्टी तालुका येथील श्री छत्रपती शाहू, फुले, आंबेडकर, कृषी महाविद्यालयातील चतुर्थ वर्षातील विध्यार्थी कृषीदूत यांचे  चिखली नाथ गावात आगमन झाले आहे यावेळी कृषीदूत श्रीशैल्य श्रीकांत पवार, निखिल पाउलबुधे, विपुल मोरे, सामीद मिर्झा, शिवा कृष्णा पूजाला,वेणू जानापाटी , धनराज बोज्जा , किरणकूमार सुन्नम, यांचे शेतकर्‍यांनी उस्फुर्त प्रतिसाद देऊन स्वागत केले. प्राचार्य डॉ श्रीराम आरसुळ व प्रा. तांबोळी आय. एम. यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीतांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम 2023- 2024 याबाबत सविस्तर माहिती शेतकर्‍यांना दिली हे कृषीदुत शेतकरी यांना 3 महिने गावकर्‍यांना शेति विषयी मार्गदर्शन करणार आहेत यावेळी मा.सरपंच तात्यासाहेब नवनाथ लाड, मा.उपसरपंच बाळासाहेब शिरुळ ग्रामस्थ अशोक लाड, पांडुरंग नागरगोजे, महादेव लाड, नवनाथ शिंदे, अखिल बाबामीया शेख. कार्यक्रम अधिकारी प्रा. गुंजाळे बि. आर.  शेतकरी बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीशैल्य श्रीकांत पवार याने करत असताना कृषी कार्यानुभव कार्यक्रम 2023- 2024
विविध शेतीसंबंधी व्यवसाय याबद्दल गावकर्‍यांना मार्गदर्शन केले.

COMMENTS