Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 धर्मग्रंथाची विटंबना करणार्‍यांना अटक करा ः मोरे

कोपरगाव/शहर प्रतिनिधीः कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी येथे काही दिवसांपूर्वी अज्ञात समाजकंटकाने मस्जिदमध्ये घुसून पवित्र ग्रंथ कुराण शरीफची विटंब

आमदार काळेंच्या पुढाकारातून कोपरगावची बाजारपेठ फुलणार
डॉ. गणेश चव्हाण पुणे विद्यापीठाच्या भूगोल अभ्यास मंडळावर
अशोक’ चा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ संपन्न

कोपरगाव/शहर प्रतिनिधीः कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी येथे काही दिवसांपूर्वी अज्ञात समाजकंटकाने मस्जिदमध्ये घुसून पवित्र ग्रंथ कुराण शरीफची विटंबना केली. या घटनेला 10 दिवस उलटूनही अद्याप आरोपीस अटक न झाल्याने विवीध ठिकाणी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर कोपरगाव शहरातील शिवसेना ठाकरे गटाचे माजी शहर प्रमुख भरत मोरे यांनी या प्रकरणातील आरोपीस अटक न झाल्यास उपोषणाचा इशारा दिला आहे. तसे पत्र शहर पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे यांच्याकडे देण्यात आले.
यावेळी बोलताना भरत मोरे म्हणाले की, हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. आणि मी छत्रपती शिवरायांचा मावळा असल्याने मी त्यांच्या मार्गावर चालणार असून, ज्या पद्धतीने छत्रपती शिवरायांनी 18 पगड जाती आणि बारा बलुतेदार यांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती. महाराजांनी कधीही इतर धर्मियांचा व धर्मग्रंथांचा अनादर केला नाही. जातीय वाद केला नाही. कोपरगावात कोळगाव थडी येथे जी पवित्र धर्मग्रंथाची विटंबना झाली. मी त्या घटनेचा निषेध करतो, कोणत्याही धर्माचा धर्मग्रंथ हा पवित्र असतो. काही समाजकंटक गैरकृत्य करत असतील. आणि जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल. असे कृत्य करत असतील तर पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींचा शोध घेऊन अटक करावी. अन्यथा 25 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ माझा व्यवसाय बंद ठेवून एक दिवसीय निरंकार उपोषण करणार  आहे.

COMMENTS