Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुश्रीफांवर अटकेची टांगती तलवार

आज हजर राहण्याचे ईडीचे समन्स

मुंबई/प्रतिनिधी ः साखर कारखाना कर्ज प्रकरणात अधिक चौकशीसाठी सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांना समन्स बजा

मनोहर जोशींच्या निधनावर राज ठाकरेंची भावनिक प्रतिक्रिया
चंद्रमुखी फेम अमृता खानविलकर पहिल्यांदा ऐतिहासिक भूमिकेत
गैरहजर विद्यार्थ्यांच्या घरी पोहोचले शिक्षक

मुंबई/प्रतिनिधी ः साखर कारखाना कर्ज प्रकरणात अधिक चौकशीसाठी सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांना समन्स बजावण्यात आले आहे. यात यांना आज सोमवारी (13 मार्च) ईडी कार्यालयात हजर राहण्याची सूचना करण्यात आली आहे. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना, अप्पासाहेब नलवडे साखर कारखाना कर्ज प्रकरणात ईडीकडून मुश्रीफ यांच्या कुटुंबीयांची चौकशी सुरू आहे.

आतापर्यंत त्यांची थेट चौकशी झालेली नाही. दोन वेळा ते घरी नसतानाच ईडीकडून छापेमारी झाली आहे. आतापर्यंत त्यांच्याविरुद्ध ईडीकडून 35 कोटींच्या मनी लाँड्रिंग, तसेच मुरगूडमध्ये 40 कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात त्यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर अवघ्या काही तासांतच शनिवारी सकाळी ईडीचे पथक मुश्रीफांच्या निवासस्थानी पोहोचले. कागलमध्ये आतापर्यंत तिसर्‍यांदा छापेमारीचे सत्र झाले. तब्बल साडे नऊ तास ईडीचा फौजफाटा मुश्रीफांच्या घरी तळ ठोकून होता. यावेळी मुश्रीफ यांच्या पत्नी, दोन मुले आणि नातवंडे उपस्थित होती. दिवसभराच्या छापेमारीनंतर ईडीकडून समन्स बजावण्याची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान सलगच्या चौकशीमुळे कुटुंबीय त्रस्त होऊन गेले आहेत.

COMMENTS