इस्लामपूर / प्रतिनिधी : साहेब तुम्ही याल व परत जाल….पण या शहरातील नागरिकांचा मुलभूत प्रश्न सुटला पाहिजे. सध्या शहरात विकास कामांचा बोजवारा उडाला
इस्लामपूर / प्रतिनिधी : साहेब तुम्ही याल व परत जाल….पण या शहरातील नागरिकांचा मुलभूत प्रश्न सुटला पाहिजे. सध्या शहरात विकास कामांचा बोजवारा उडाला आहे. विविध विकास कामांना मंजूरी मिळून ही अजून झाली नाहीत. शहरातील स्वच्छता, आरोग्याचे प्रश्न, गटारी, रस्ते, घरकुल तसेच विविध प्रश्नांवरून माजी नगराध्यक्ष व भाजापाचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी पालिका प्रशासनाला धारेवर धरत कामे व्यवस्थीत करा अन्यथा मी कार्यक्रम लावेन, असा इशारा दिला.
शहरातील विविध समस्यांबाबत माजी नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी पालिकेत मुख्याधिकारी तथा प्रशासकांच्या दालनात आले. यावेळी त्यांनी सर्वच विभागप्रमुखांवर प्रश्नांची सरब्बती करत कान उघडणी केली.
जानेवारी 2022 पासून शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. यासाठी 11 कोटींचा निधी येवून आजही कामे अपुरी आहेत. आष्टा नाका, कामेरी नाका, चव्हाण कार्नर या ठिकाणी बसवण्यात आलेली ट्रॉफिक सिग्नल यंत्रणा सतत बंद अवस्थेत असते. याठिकाणी पोलिस कर्मचारीही उपस्थित नसतात. काही ठिकाणी गटारीची व्यवस्था नसल्याने हे पाणी रस्त्यावरून ओढ्यासारखे वाहत आहे. येथील दुकानांमध्ये पावसाचे पाणी जावून त्यांच्या साहित्यांचे नुकसान झाले आहे. दिवाबत्तीची अवस्था त्याहून ही बिकट आहे. अनेक ठिकाणी दिवसा ही लाईट सुरू राहते. याचा आर्थिक भुर्दंड पालिकेला बसत आहे.
शहरातील काही भागात मुबलक पाणी मिळत नाही. पिण्याच्या पाण्याचे नियोजन पुर्णत: कोलमडले आहे. यावर प्रशासनाने तात्काळ लक्ष द्यावे. शहरात कोणताही कर न भरता डिजीटल लावली जातात. यावर प्रशासनाचे नियंत्रण नाही. स्वच्छतेच्या बाबतीत ही नियोजन नाही. काही ठिकाणी चार दिवसातून एकदा घंटा गाडी जाते. शहरामध्ये घाणीचे साम्राज्य पसरून डेंग्यू, मलेरीया यासारख्या आजाराने नागरिक त्रासले आहेत. याकडे आरोग्य विभागाचे लक्ष नाही. शहरातील वाहतुक कोंडीवर पालिकेचे दुर्लक्ष आहे. अनेक ठिकाणी प्रवाशी व नागरिकांच्यामध्ये वाद होत आहेत. यावर पालिकेने योग्य उपाययोजना कराव्यात. मुख्याधिकारी वैभव साबळे यांनी शहरातील विविध समस्या लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन दिले.
COMMENTS