रस्त्यावर वाढदिवस साजरा करणे भोवले

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रस्त्यावर वाढदिवस साजरा करणे भोवले

अहमदनगर/प्रतिनिधी ः सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा करणे काही तरुणांना चांगलेच महागात पडले. यावेळी फटाके वाजवून मोठ्याने आरडाओरडा केल्याची घटना आशा टॉ

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजनची तीन पट व्यवस्था करावी
मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ मोटर सायकल रॅलीचे आयोजन
ग्राहक संरक्षण संस्थेचे आमकर यांनी अकोल्यात घेतला आढावा

अहमदनगर/प्रतिनिधी ः सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा करणे काही तरुणांना चांगलेच महागात पडले. यावेळी फटाके वाजवून मोठ्याने आरडाओरडा केल्याची घटना आशा टॉकीज चौकात घडली.
येथील तख्ती दरवाजा येथे शनिवारी (दि.11) रात्री 9.30 वाजता फटाके फोडल्याचा आवाज आला. त्यावेळी पोलिस नाईक योगेश खामकर व कॉन्स्टेबल प्रमोद लहारे यांनी त्या ठिकाणी जाऊन खात्री केली असता काहीजण सार्वजनिक ररस्त्यावर केक कापून वाढदिवस साजरा करून फटाके फोडत असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी पोलिसांना पाहून ते निघून गेले त्यापैकी तिघांना थांबवले असता त्यांनी त्यांची नावे सद्दाम सिकंदर खान (रा. बँक कॉलनी, केडगाव, नगर), अल्लारखा शेख कासम (रा.आशा टॉकीज, नगर), साविर आयुब्ब शेख (रा. आशा टॉकीज) व अज्जु सय्यद उर्फ मेंबर (रा. आशा टॉकीज चौक) असे असल्याचे व अल्लारखा शेख कासम याचा वाढदिवस साजरा करत होतो, असे सांगितले. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी कॉन्स्टेबल उमेश शेरकर यांच्या फिर्यादीवरून त्यांच्याविरुध्द गुन्ह्याची नोंद केली.

COMMENTS