इम्फाळ/वृत्तसंस्था ः गेल्या दोन महिन्यापासून मणिपूर राज्यात उसळलेला हिंसाचार अजूनही काही थांबण्याची चिन्हे नसून, मणिपूरमध्ये शस्त्रास्त्रे लुटण्य
इम्फाळ/वृत्तसंस्था ः गेल्या दोन महिन्यापासून मणिपूर राज्यात उसळलेला हिंसाचार अजूनही काही थांबण्याची चिन्हे नसून, मणिपूरमध्ये शस्त्रास्त्रे लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्यातून सुरक्षा दलांवर केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
थौबल जिल्ह्यातील भारतीय राखीव बटालियनच्या कॅम्पवर जमावाने हल्ला करून शस्त्रे चोरण्याचा प्रयत्न केला. यावेळी जमाव आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. सशस्त्र जमावाने गोळीबार केला, त्याला प्रत्युत्तर म्हणून लष्कराला गोळीबार करावा लागला. एक 27 वर्षीय जवान शहीद झाला, तर आसाम रायफल्सचा एक जवान गोळी लागून जखमी झाला. अधिकार्यांनी सांगितले की जमावाने छावणीकडे जाणारे अनेक रस्ते रोखले, अतिरिक्त सुरक्षा दलांना तेथे पोहोचण्यापासून रोखले, परंतु सैन्याने कसे तरी पुढे जाण्यात यश मिळविले. दरम्यान, जमावाने जवानांची गाडीही पेटवून दिली. मणिपूरमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सरकारने शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. पहिली ते आठवीपर्यंतच्या मुलांसाठी बुधवारपासून शाळा सुरू होणार आहेत. नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा आणि महाविद्यालये अद्याप सुरू होणार नाहीत. या शाळांमध्ये मदत शिबिरे उभारण्यात आली आहेत. या छावण्यांमध्ये 50 हजारांहून अधिक लोक राहत आहेत. मुख्यमंत्र्यांनी गावांमध्ये बांधलेले खासगी बंकर हटवण्याचे आदेश दिले होते, परंतु आदिवासी संघटना इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरमने ते मान्य करण्यास नकार दिला. राज्यातील 16 पैकी 5 जिल्ह्यांमधून संचारबंदी उठवण्यात आली आहे. आता 11 जिल्ह्यांमध्ये सायंकाळी 5 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी सुरू आहे. 3 जुलै रोजी चुराचंदपूर येथील सोंगपी येथील कुकी नॅशनल ऑर्गनायझेशनचे प्रवक्ते सेलेन हाओकिप यांच्या घराला काही अज्ञात लोकांनी आग लावली. कांगपोकपी भागात सोमवारी हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी फिलिंग गावात गोळीबार करण्यात आला. मणिपूरच्या शेजारील राज्य मिझोरामचे मुख्यमंत्री झोरमथांगा यांनी मंगळवारी सांगितले की, सुमारे 15,000 लोकांनी येथे आश्रय घेतला आहे.
COMMENTS