Homeताज्या बातम्याविदेश

युद्धबंदी संपली; इस्रायलकडून पुन्हा बॉम्बफेक सुरू

जेरूसेलम ः गेल्या काही दिवसांपासून इस्त्रायल आणि हमासदरम्यान चार दिवसांपासून सुरू असलेली युद्धबंदी संपली असून, इस्त्रायलकडून पुन्हा एकदा गाझापट्ट

मानवी तस्करी प्रकरणी फ्रान्सनं 4 दिवस रोखून धरलेलं विमान मुंबईत दाखल
अधिवेशनात अभूतपूर्व गोंधळ दिशा सालियान मृत्यू प्रकरणी होणार एसआयटी चौकशी
बोरामणी विमानतळ हा दुसरा पर्याय सोलारपूरकरांच्या दृष्टीने हिताचा ठरू शकतो – रोहित पवार 

जेरूसेलम ः गेल्या काही दिवसांपासून इस्त्रायल आणि हमासदरम्यान चार दिवसांपासून सुरू असलेली युद्धबंदी संपली असून, इस्त्रायलकडून पुन्हा एकदा गाझापट्टीवर बॉम्ब फेकत युद्ध छेडले आहे. इस्रायलच्या लष्कराने गाझा पट्टीवर हवाई हल्ले केले. यात 9 पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले. इस्रायल आणि हमासदरम्यानची युद्धबंदी संपली आहे. युद्धबंदी संपल्यानंतर इस्रायलच्या लष्कराने गाझा पट्टीवर आजपासून पुन्हा बॉम्बफेक सुरू केली आहे.
अमेरिका तसेच मध्यपूर्वेतील कतार आणि इजिप्त या देशांसह काही आंतरराष्ट्रीय संघटनांनी मध्यस्थी केल्यानंतर इस्त्रायल आणि हमासने 22 नोव्हेंबर रोजी सुरूवातीला चार दिवसांसाठी युद्धबंदी लागू केली होती. त्यानंतर आणखी चार दिवसांसाठी युद्धविरामचा विस्तार करण्यात आला होता. परंतु शुक्रवारी, स्थानिक वेळेनुसार सकाळी 7 वाजता हा युद्धविराम कालबाह्य झाल्याने इस्त्रायली लष्कराकडून हल्ले सुरू करण्यात आले. युद्धविराम संपल्यामुळे गाझामध्ये इस्त्रायलकडून लष्करी कारवाई आणि हवाई हल्ले पुन्हा सुरू करण्यात आल्याचे इस्त्रायलकडून सांगण्यात आले. दरम्यान, इस्त्रायलने पुन्हा सुरू केलेल्या लष्करी कारवाईमध्ये दोन तासांच्या कालावधीत 9 पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले असल्याची माहिती पॅलेस्टिनी आरोग्य खात्याने दिली. गाझामधून हमासने ओलिस ठेवलेल्या इस्रायली बंदिवानांची सुटका केल्यानंतर युद्धबंदीच्या सातव्या दिवशी देवाणघेवाणीद्वारे इस्रायलने 30 पॅलेस्टिनी कैद्यांची तुरुंगातून सुटका केली होती. कतारच्या मध्यस्थीनंतर इस्त्रायल आणि हमासमध्ये झालेल्या युद्धविराम करारानुसार इस्रायलच्या तुरुंगात कैदी म्हणून बंदी असलेल्या 300 पॅलेस्टिनी महिला आणि मुलांची सुटका करण्याचे मान्य करण्यात आले होते. त्यानुसार या कैद्यांची सुटका करून त्यांना वेस्ट बँक आणि पूर्व जेरुसलेममधील त्यांच्या घरी परत पाठवले गेले होते. तर हमासच्या ताब्यात असलेल्या 240 ओलिसांपैकी 56 ओलिसांची सुटका करण्यात आली होती. यामध्ये 39 इस्त्रायली नागरिक आणि इतर थायलंड, रशिया आणि अमेरिकेचे नागरिक होते. युद्धविरामदरम्यान इस्रायलने गाझामध्ये अतिरिक्त इंधन आणि मोठ्या प्रमाणात मानवतावादी मदत जाऊ देण्यासही सहमती दर्शविली होती. इस्त्रायलच्या लष्कराकडून वेढा घातलेल्या पॅलेस्टिनी भूभागाला सध्या अभूतपूर्व अशा मानवतावादी संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यानंतर इस्रायलने गाझापट्टीमध्ये इंधन आणि मदत पुरवठा रोखून धरला होता. त्यामुळे काही काळ युद्धबंदी केल्यामुळे गाझापट्टीतील नागरिकांना याचा लाभ झाला होता.

COMMENTS