पुणे : मागील काही दिवसात पुणे शहरात गुन्हेगारीचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढलेले असून शहराच्या वेगवेगळया भागात घडणार्या घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा

पुणे : मागील काही दिवसात पुणे शहरात गुन्हेगारीचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढलेले असून शहराच्या वेगवेगळया भागात घडणार्या घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यात पोलिसांना अपयश आले आहे. लोणीकंद परिसरातील नायगाव येथील बिवरी येथे राहणार्या प्रशांत विलास गोते (वय-40) यांचे कुटुंबीय राहते घरात झोपले असताना, मध्यरात्री पावणेदोन वाजता सशस्त्र सात चोरटे घराचा मुख्य दरवाजा कटावणीने उघडून बळजबरीने घरात शिरले. घरातील लोकांना झोपेतून उठवून त्यांनी सगळयांचे गळयाला चाकु लावून जीवे मारण्याची धमकी दिली. घरातील बेडरुम मधील कपाटातील पाच लाख रुपये रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने जबरीने काढून घेतले. तक्रारदार प्रशांत गोते यांचे पत्नीचे, आईचे, बहीणीचे गळयाला चोरटयांनी चाकू लावून जिवे मारण्याची धमकी देत गळयातील सोन्याचे दागिने जबरीने काढून, ओढून घेतले. त्यानंतर तक्रारदार यांच्या बहीणीला बुक्क्याने मारुन कानाला , तोंडाला दुखापत करुन एकूण 16 लाख 30 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम जबरीने काढून घेऊन मोबाईल फोन फोडून नुकसान करुन पळून गेले. याबाबत पुढील तपास लोणीकंद पोलिस करत आहे.
COMMENTS