Homeताज्या बातम्यामनोरंजन

अरमान मलिक 5व्यांदा होणार आहे बाबा

अरमान मलिक हे नाव युट्यूब विश्वात फार प्रसिद्ध आहे. हैदराबादचा हा युट्यूबर त्याच्या खासगी आयष्यामुळे सर्वाधिक चर्चेत असतो. पायल आणि कृतिका या त्य

नेवाशात तिघांची 35 लाखांची फसवणूक
सरकारने जाणिवपूर्वक मागासवर्गियांचे प्रमोशन थांबवले – हरिभाऊ राठोड 
*डेल्टा प्लसचा महाराष्ट्रात पहिला बळी l DAINIK LOKMNTHAN*

अरमान मलिक हे नाव युट्यूब विश्वात फार प्रसिद्ध आहे. हैदराबादचा हा युट्यूबर त्याच्या खासगी आयष्यामुळे सर्वाधिक चर्चेत असतो. पायल आणि कृतिका या त्याच्या दोन पत्नी आहेत. काही महिन्यांपूर्वीच या दोघी एकत्र गरोदर होत्या. युट्यूब व्लॉगद्वारे हे तिघं त्यांच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी युजर्ससोबत शेअर करत असतात. एप्रिल महिन्यात पायल आणि कृतिकाने तीन मुलांना जन्म दिला. पायलने तिच्या जुळ्या मुलांचं नाव अयान आणि तुबा असं ठेवलं. तर कृतिकाने तिच्या मुलाचं नाव जैद असं ठेवलं. आता अरमानची दुसरी पत्नी कृतिका मलिक ही पुन्हा एकदा आई होणार असल्याचं कळतंय. याबद्दलचा खुलासा खुद्द कृतिकाने तिच्या नव्या व्लॉगमध्ये केला आहे. कृतिकाने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती म्हणतेय, “तुम्हा सर्वांसाठी एक गुड न्यूज आहे. पण मला समजत नाहीये की मी ते कसं सांगू? मी पुन्हा एकदा आई होणार आहे. मी गरोदर आहे.” यानंतर ती अरमान मलिकला आणि इतर सर्व कुटुंबीयांना ही गोड बातमी सांगते. यावर पायल आणि अरमान सोडून घरातील इतर सदस्य कृतिकाला म्हणतात, की किमान जैद सहा महिने होईपर्यंत तरी वाट पाहायची होती. हे ऐकल्यानंतर कृतिका डॉक्टरांना भेटायला जाते. या व्लॉगमध्ये पुढे पायल कृतिकाला म्हणते की, ती तिच्यावर नाराज आहे. कारण कृतिकाने गरोदर असल्याची बातमी सर्वांत आधी तिला नाही सांगितली. यानंतर चिकू म्हणतो की तो त्याची आई पायलसोबत घर सोडून निघून जाईल.

COMMENTS