नाशिक - शनिवार दि. १० फेब्रुवारी रोजी नाशिक मध्ये राज्यातील पहिले वातानुकूलित बस स्टँड चे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री नामदार फडणवीस यांचे ह
नाशिक – शनिवार दि. १० फेब्रुवारी रोजी नाशिक मध्ये राज्यातील पहिले वातानुकूलित बस स्टँड चे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री नामदार फडणवीस यांचे हस्ते मेळा बसस्थानकाचे उद्घाटन झाले आणि १२ फेब्रुवारी पासून ते सर्व सामान्यांच्या सोयी साठी सज्ज झाले. नाशिक मध्य च्या आमदार सौ देवयानीताई फरांदे यांनी मोठ्या लकबीने यश पदरात पाडले असले तरी प्रवाशी मात्र उन्हाच्या झळा खातांना दिसत आहेत. त्यामुळे मोठया दिमाखात जाहिरात केलेले हे मेळा बसस्थानक हाय प्रोफाईल प्रवाशांकरिता असावे असे म्हणत अंदाजे जवळपास ७० % लोक वातानुकूलित जागेतून बाहेर येतांना दिसत आहेत. एस टी महामंडळाचे हे भव्यदिव्य वातानुकूलित बस स्टँड मध्ये भव्य दोन एसी केबिन बनविल्या मात्र तिकिटं विचारून मगच मध्ये सोडले जाते अन्यथा प्रवाशांना नेहमी प्रमाणे बाहेरच थांबावे लागत असक्याने बहुतांश प्रवाशी हे नाराजच असतात. सर्व सामान्यांचे सरकार आजच प्रवाशांना एवढ्या घाईघाईने का हाकलून देत असल्याचे चित्र मेळा बसस्थानकात दिसून येत आहेत ?
प्रवाशांच्या प्रतिक्रिया –
१) आम्ही गंगेकिनारी असल्याने आम्हास कृत्रिम हवेची गरज वाटत नाहीत त्यामुळे आम्ही देखील कृत्रिम सरकारचा विचार करू ?
२) बनावट सरकारमुळे आज प्रवाशांच्या हाती निराशाच पदरी पडली
३) हायटेक जाहिराती करून हाय प्रोफाईल लोकच एसीत बसवले त्यामुळे सामान्य लोकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सरकार करत आहेत की काय ?
४) मेळा बस स्थानक हे पूर्वी पासून सर्व सामान्यांचे आहेत , नाशिक – त्र्यम्बकेश्वर येथून जाणारी वारकरी मंडळी ह्याच मेळा बसस्थानकातून त्र्यम्बक राजाकडे प्रस्थान करतात मात्र पुढील काळात ही जागा देखील निघून जाते की काय ?
COMMENTS