Homeताज्या बातम्यासंपादकीय

निवडणूका संपताच केंद्रीय मंत्री सरंजामी दानवे यांचा गुंडांकरवी ओबीसी कुटुंबावर सशस्त्र हल्ला!

ओबीसी समाजावरील रागातून जवखेडा-दानवे येथील घटना!

लोकसभा मतदानाचा पाचवा टप्पा पूर्ण झाला  आणि महाराष्ट्रातील निवडणूका संपल्या. निवडणूकांचा संग्राम सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबी

विधानसभेत ‘तारीख पे तारीख’ तर ऍड. आंबेडकरांचा काॅंग्रेसला इशारा !
कर्पुरी ठाकूर यांच्या भारतरत्न निमित्ताने !
पुरस्कार वापसी आणि संसदीय समिती ! 

लोकसभा मतदानाचा पाचवा टप्पा पूर्ण झाला  आणि महाराष्ट्रातील निवडणूका संपल्या. निवडणूकांचा संग्राम सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी असं वातावरण निर्माण करण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणूका लढल्या गेल्या. परंतु, या निवडणुकीत ओबीसी समुदायाचा कोणताही उपद्रव राजकीयदृष्ट्या निर्माण झाला नाही! तरीही, महाराष्ट्रात निवडणूका संपल्या संरजामी माज असलेल्या एका केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी भाडोत्री मराठा गुंडांकरवी जवखेडा-दानवे ता. भोकरदन जि. जालना येथील पारंपरिक रोजगारावर जगणारे गजानन बाबुलाल संत्रे या नावाचे मायक्रो ओबीसी समाजाचे कुटूंब आपल्या वडिलोपार्जित मातीच्या घरात राहतात. याच कुटुंबांवर २२ मे २०२४ रोजी या गावातील धन-दांडग्या व जात-दांडग्या गुंडांनी रात्री १२ ते १ वाजेदरम्यान कोयते, लोखंडी पाईप, सळ्या अशा शस्त्रांनिशी हल्ला चढवला. या हल्ल्यात कुटुंबातील सर्व सदस्यांना बेदम मारहाण  केली; एवढ्यावरच सरंजामी जातीयवादी गुंड थांबले नाहीत, तर त्यांनी संत्रे कुटुंबातील वयोवृद्ध असणाऱ्या स्त्रीला देखील लाकडी दांडक्यांनी बेदम मारहाण केली.  एवढ्यावर थांबतील तर ते सरंजामी गुंड कसले! संत्रे कुटुंबाला जिवानिशी ठार करायच नाहीतर त्यांच राहतं घर उद्ध्वस्त करायचे या इराद्याने आलेल्या सरंजामी गुंडांनी संपूर्ण घर जमीनदोस्त केले. आता हे कुटुंब बेघर झाले असून रस्त्यावर आले आहे. या मराठा गुंडांना आमदार दानवे व मंत्री दानवे यांचा आश्रय असल्याने पोलीसांचे संरक्षणही या गुंडांना लाभलेले आहे.

      पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी पंतप्रधान आहेत. एका बाजूला ओबीसी नेतृखाली मंत्रीपद उपभोगत असलेल्या केंद्रीय मंत्री दानवे यांनी संत्रे कुटुंबावर भाडोत्री गुंडाकरवी हल्ला चढवण्याचे कारण लोकसभा निवडणुकीत ओबीसींवर दानवे यांचा असणारा राग हेच कारण आहे. संत्रे कुटुंब हे जवखेडा-दानवे गावाचे मुळ रहिवासी आहेत. त्यांचे घर मातीचे असून मटकी घडविण्याच्या परंपरागत व्यवसायातून ते आपली उपजीविका चालवतात. वास्तविक, हे कुटुंब गावातील मायक्रो ओबीसी समाजाचे एकमेव कुटुंब आहे. ओबीसींमधल्या छोट्या जाती या कोणत्याही गावात शांततेत आपली गुजराण करित असतात. राजकारणाविषयी तर, गावातील छोट्या ओबीसी जाती कधीही भूमिका घेत नाहीत. गावातील जे सत्ताधारी असतील त्यांच्या पाठीशी ते निमूटपणे उभे राहतात. जवखेडा-दानवे गावातील संत्रे कुटूंबात तीन तरूण कर्ती माणसं. मातीची मडकी बनवून विकणं, एवढाच त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय. कधी कुणाशी राजकीय संबंध नाही. राजकारण कशाशी खातात याचीही त्यांना माहिती नाही. तरीही, या कुटुंबावर केंद्रीय मंत्र्यांनी गुंड लावून हल्ला केला, असा आरोप संत्रे कुटुंबातील तीनही भावांनी केला आहे. केंद्रीय मंत्र्यांचे या अतिसामान्य कुटूंबाने काय वाकडे केले होते ?

      संत्रे कुटुंबावर हल्ला करण्याचे एकमेव कारण म्हणजे नुकत्याच संपलेल्या लोकसभा निवडणुकीत ओबीसींनी आपल्याला मतदान केले नाही, या सरंजामी गैरसमजातून त्यांनी गावातीलच एखाद्या गरीब ओबीसी कुटुंबावर हल्ला करून मतदार संघातील सर्व ओबीसी समुदायाला भीतीत आणून,  ओबीसींनी आपल्या आदेशाबरहुकूम वागावे, असा अलिखित फतवा काढण्याचा हा प्रकार आहे. हल्ल्यामागे असलेल्या या निश्चित कारणाचा कोणालाही उलगडा होवू नये, म्हणून संत्रे कुटुंबाचे घर जमीनदोस्त करून पीडब्ल्यूडी ला मध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला आहे. वास्तविक, त्या गावातून- जवखेडा-दानवे- येथून जाणाऱ्या महामार्गासाठी आपल्या घराची जमीन बारा मीटर पर्यंत या कुटुंबाने स्वतः मोजून दिली आहे. त्यासंदर्भात कोणताही वाद नसताना त्यांचे घर पाडले गेले. याचा एकमेव अर्थ हाच आहे, राज्यातील समस्त सरंजामी मराठ्यांना ओबीसींवर थेट हल्ला चढवा, असा संदेश देणेच आहे. त्यामुळे, ओबीसी समाजाचा पंतप्रधान देशात असताना ओबीसींवर हल्ल्याचा असा अघोषित फतवा काढणाऱ्यांविरोधात राज्यातील समस्त ओबीसींनी एक व्हा.

    कोणतीही घटना वरकरणी दिसते तितकी ती सरळ नसते. जवखेडा-दानवे या गावातील गरीब मायक्रो ओबीसी कुटुंबावर हल्ला करून दानवेंच्या गुंडांनी कोणती मर्दुमकी गाजविली आहे? बेछुट हल्ला, बुलडोझर संस्कृतीचे प्रदर्शन, म्हणजे महाराष्ट्रात पहिल्यांदाच एखाद्या गरीब कुटुंबार हल्ला करताना घरही जमीनदोस्त करून उत्तर भारतीय संस्कृती महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या हल्ल्यात विरोधात तमाम पुरोगामी म्हणून मिरवणाऱ्या काॅंग्रेस-राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षांनी तात्काळ हस्तक्षेप करायला हवा. पुरोगामी आघाडी म्हणून तुम्ही गरीब ओबीसी कुटुंबावर या हल्ल्याचे समर्थन करणार आहात का?
     २२ मे रोजी मध्यरात्री घडलेल्या या घटनेवर अजूनही काॅंग्रेस-राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षांनी निषेध नोंदविला नाही. याचा अर्थ त्यांचे कानावर हात आहेत का? केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या विरोधात पिडीत संत्रे कुटुंबातील सर्वच सदस्यांनी आरोप केला आहे की, हल्ला करणारे गुंड दानवे यांचे भाडोत्री गुंड होते. या गुंडांविरूध्द साधी तक्रारही नोंदवली गेली नाही. कुटुंबातील सदस्यांनी दानवे यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याची भूमिका घेतली आहे. त्यांच्या भूमिकेला महाराष्ट्राचे कर्तव्यतत्पर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना तात्काळ गुन्हा नोंदविण्याचे आदेश द्यावेत. पोलिस यंत्रणा जर कायद्यानुसार काम करित नसेल तर, समाजव्यवस्था कोलमडून पडेल!

दखल
डॉ. अशोकराव सोनवणे,
संपादक (दैनिक लोकमंथन)

COMMENTS