गेवराई प्रतिनिधी - गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथील राशन दुकान क्र. 02 याचा मनमानी कारभार चालू आहे कारण सिरसदेवी मध्ये राशन दुकान 03 आहेत या तिन
गेवराई प्रतिनिधी – गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथील राशन दुकान क्र. 02 याचा मनमानी कारभार चालू आहे कारण सिरसदेवी मध्ये राशन दुकान 03 आहेत या तिन्ही दुकानं पैकी 02 राशन दुकानानी मार्च 2023 या महिन्याचे राशन वाटप केले आहे परंतू दुकान क्र.02 या दुकानदाराने राशन येऊन सुद्धा कार्ड धारकांना वाटप केले नाही त्यामुळे या दुकान दाराचा मनमानी कारभार चालू आहे हे दिसत आहे यामुळे सिरसदेवी ग्रामस्तानी कायम स्वरूपी दुकान निलंबित करण्याची मागनी गावातील नागरिकांमधून होत आहे.
तालुक्यातील सिरसदेवी गावामध्ये राशन दुकान हे 03 आहेत या दुकाना पैकी दोन दुकान दारानी मार्च महिन्याच्या आत कार्ड धारकांना राशन वाटप केले आहे परंतु दुकान न.02 याने राशन येऊन सुद्धा कार्ड धारकांना वाटप न केल्याने या राशन दुकान दाराचा मनमानी कारभार चालू हे दिसत आहे. विशेष म्हणजे हे राशन दुकान सस्पेंड झालेले आहे कारण या दुकानाच्या अनेक तक्रारी मा. जिल्हा अधिकारी, गेवराई तहसीलदार यांच्या कडे गेल्या आहेत जसे की वेळेवर राशन न वाटप न करणे, कार्ड धाराकांना राशन दिलेली पावती न देणे, राशन कमी देणे, पंतप्रधान गरीब कल्याण येजनेचे मोफत चे राशन येऊन सुद्धा न देणे अश्या अनेक तक्रारी सिरसदेवी गावातील नागरिकांनी दिल्या आहेत. यामुळे हे दुकान सस्पेंड झाले आणि हेच दुकान मा. गेवराई तहसीलदार यांनी हे दुकान जातेगांव येथील भूषण वक्ते या नावाच्या व्यक्तीला दुकान जोडले गेले आहे परंतु हा दुकान दारही अगोदरच्या दुकानदाराशी सगनमत करुन या राशन चोराच्या घरीच रेशन वाटप करत असल्याची धाकदायक माहिती समोर येत आहे. त्यामुळे अश्या मुजोर,आणि राशन चोराच्या घरी रेशन वाटप करण्याची परवानगी कोणी दिली आहे. याची चौकशी करुन सिरसदेवी येथील राशन दुकान दार व जातेगांव येथील भूषण वक्ते यांच्या वर चौकशी करुन कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सिरसदेवी येथील कार्ड धारक करत आहेत.
COMMENTS