Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदनगर शहराचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यानगर करण्यास मान्यता

मुंबई प्रतिनिधी - एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरु असताना दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात आज राज्याच्या मंत्रिमंडळ

येवला तालुक्याच्या पूर्व भागात पावसाचे दमदार आगमन I LOKNews24
बँक बचावची आश्‍चर्यकारक माघार, सहकार वर्चस्वाच्या दिशेने…
ना.भुजबळ साहेब! आश्रीत नाही तर बांडगुळांचे वेल उपटा!!

मुंबई प्रतिनिधी – एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरु असताना दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात आज राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत एकूण 26 निर्णय घेण्यात आले असून अहमदनगर शहराचे नावे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  अहमदनगर शहराचे नाव ‘अहिल्यानगर’ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. तसेच वेल्हे तालुक्याचे नाव ‘राजगड’ करण्याच्या मंत्रिमंडळाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे की,  पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारा, त्यांचे विचार, कार्य, स्मृती पुढे घेऊन जाणारा, लोकप्रतिनिधींना चांगले कार्य करण्यासाठी प्रेरणा देणारा आहे. यानिर्णयाने अहमदनगर शहरवासियांची, जिल्हावासियांची, महाराष्ट्रातील तेरा कोटी नागरिकांची महत्वाची इच्छा पूर्ण झाली आहे. हा निर्णय होण्यात आमदार सर्वश्री संग्राम जगताप, दत्तामामा भरणे, आशुतोष काळे, नितीन पवार या लोकप्रतिनिधींनी महत्वाची भूमिका बजावली. त्या सर्वांचे तसेच समस्त महाराष्ट्रवासियांचे मी मनापासून अभिनंदन करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहमदनगर शहराचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले असून मुख्यमंत्री तसेच राज्य मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत. 

COMMENTS