Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संवत्सर महानुभाव आश्रमाच्या विकास कामांना मान्यता

कोपरगाव :  तालुक्याला आध्यात्मिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला असून मतदारसंघातील धार्मिक स्थळांचा विकास करून त्यांना आधुनिक सुविधांनी सुसज्ज करण्यासाठी आमदार आशुतोष काळे नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यांच्या अशाच सातत्यपूर्ण प्रयत्नांनातून कोपरगाव मतदार संघातील पवित्र गोदावरी तीरावर असलेल्या संवत्सर येथील महानुभाव आश्रम ब्रह्मविद्या पाठशाळेच्या पाच कोटीच्या विकासकामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्याबद्दल आमदार आशुतोष काळे यांनी राज्यशासनाचे आभार मानले आहे.  महानुभाव आश्रम हा केवळ कोपरगाव तालुक्यापुरता मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रातील महानुभाव पंथीय अनुयायांचे अत्यंत महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. यामुळे आश्रमात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम, प्रवचन आणि पाठशाळेच्या माध्यमातून ज्ञान दानाचे कार्य सुरू असते. आश्रमात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे आश्रमातील पायाभूत सुविधांची उपलब्धता व्हावी यासाठी आ.आशुतोष काळे यांनी राज्य शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून विशेष निधी उपलब्ध केला आहे. प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या या ५ कोटी रुपयांच्या विकास कामातून आश्रमाचा चेहरामोहरा बदलणार आहे. महत्त्वाची विकास कामे हाती घेऊन भाविकांच्या निवासासाठी सुसज्ज भक्त निवास तयार करण्यात येणार आहे. तसेच आश्रमाच्या सुरक्षेसाठी चहूबाजूंनी संरक्षक भीत व परिसराच्या सुशोभीकरणासाठी सर्वत्र पेव्हिंग ब्लॉक बसवून आश्रमाच्या परिसरातील अंतर्गत दर्जेदार सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार करण्यात येणार आहे.  मतदारसंघातील प्रत्येक गाव आणि तेथील धार्मिक स्थळ हे मतदार संघाचे वैभव आहे. या श्रद्धास्थानांचा विकास करून तेथे येणाऱ्या भाविकांना उत्तम दर्जाच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे हि माझी जबाबदारी आहे. संवत्सर येथील महानुभाव आश्रमाच्या पवित्र कार्याला बळकटी मिळावी आणि येथे येणाऱ्या भाविकांना एक सुखकर व मंगलमय अनुभव मिळावा याच उद्देशाने या  पाच  कोटीच्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

अक्षय कर्डिलेंची बदनामी करणाऱ्याचा छडा लावावा; अन्यथा आंदोलन ; भाजप कार्यकर्त्यांचा उपोषणाचा इशारा
महिलांसह नागरिकांच्या तात्काळ सुरक्षेसाठी रक्षक दल; संगमनेर नगरपरिषदेचा निर्णय ; महाराष्ट्रात प्रथमच रक्षकदल कार्यान्वित
कोपरगाव नगरपरिषदेस १ कोटींचे अनुदान : संधान

कोपरगाव :  तालुक्याला आध्यात्मिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला असून मतदारसंघातील धार्मिक स्थळांचा विकास करून त्यांना आधुनिक सुविधांनी सुसज्ज करण्यासाठी आमदार आशुतोष काळे नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यांच्या अशाच सातत्यपूर्ण प्रयत्नांनातून कोपरगाव मतदार संघातील पवित्र गोदावरी तीरावर असलेल्या संवत्सर येथील महानुभाव आश्रम ब्रह्मविद्या पाठशाळेच्या पाच कोटीच्या विकासकामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्याबद्दल आमदार आशुतोष काळे यांनी राज्यशासनाचे आभार मानले आहे.

 महानुभाव आश्रम हा केवळ कोपरगाव तालुक्यापुरता मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रातील महानुभाव पंथीय अनुयायांचे अत्यंत महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. यामुळे आश्रमात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम, प्रवचन आणि पाठशाळेच्या माध्यमातून ज्ञान दानाचे कार्य सुरू असते. आश्रमात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे आश्रमातील पायाभूत सुविधांची उपलब्धता व्हावी यासाठी आ.आशुतोष काळे यांनी राज्य शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून विशेष निधी उपलब्ध केला आहे. प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या या ५ कोटी रुपयांच्या विकास कामातून आश्रमाचा चेहरामोहरा बदलणार आहे. महत्त्वाची विकास कामे हाती घेऊन भाविकांच्या निवासासाठी सुसज्ज भक्त निवास तयार करण्यात येणार आहे. तसेच आश्रमाच्या सुरक्षेसाठी चहूबाजूंनी संरक्षक भीत व परिसराच्या सुशोभीकरणासाठी सर्वत्र पेव्हिंग ब्लॉक बसवून आश्रमाच्या परिसरातील अंतर्गत दर्जेदार सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार करण्यात येणार आहे.

 मतदारसंघातील प्रत्येक गाव आणि तेथील धार्मिक स्थळ हे मतदार संघाचे वैभव आहे. या श्रद्धास्थानांचा विकास करून तेथे येणाऱ्या भाविकांना उत्तम दर्जाच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे हि माझी जबाबदारी आहे. संवत्सर येथील महानुभाव आश्रमाच्या पवित्र कार्याला बळकटी मिळावी आणि येथे येणाऱ्या भाविकांना एक सुखकर व मंगलमय अनुभव मिळावा याच उद्देशाने या  पाच  कोटीच्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

COMMENTS