सुपा : जिल्हा जलसंधारण अधिकारी मृदू व जलसंधारण विभाग अहिल्यानगर गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना - २०२५ अंतर्गत पारनेर तालुक्यातील पाझर तलाव व
सुपा : जिल्हा जलसंधारण अधिकारी मृदू व जलसंधारण विभाग अहिल्यानगर गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना – २०२५ अंतर्गत पारनेर तालुक्यातील पाझर तलाव व शिवारातील गाळ उपसा करण्यासाठी मतदारसंघातील प्रस्ताव आलेल्या ९० तलावांतील गाळ उपसा करण्यासाठी रु. ९.०६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार काशिनाथ दाते सर यांनी दिली आहे.
ही योजना तीन वर्षाकरिता मर्यादित न राहता कायमस्वरूपी राबवण्यात येणार असल्याचेही आ . दाते यांनी सांगितले आहे. सदर योजनेत स्थानिक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन योजनेचा लाभ घ्यावा. तसेच सार्वजनिक व खाजगी भागीदारी, अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर, सनियंत्रण, मूल्यमापन तसेच शेतकऱ्यांना अनुदानाची मर्यादा, अंमलबजावणी संदर्भातील मार्गदर्शन व कार्यपद्धती, सनियंत्रण समिती, निधीचे स्रोत याबाबतची माहिती देण्यात येणार आहे तसेच गाळ उपसा करणेकरीता आवश्यक असलेली यंत्रसामग्री व इंधनावरील खर्च दोन्ही मिळून ( ३१ प्रति घ.मी. यानुसार) व गाळ वाहून नेण्यासाठी अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना एकरी रु. १५ हजार मर्यादेत (प्रति घ.मी. रु. ३५.७५ प्रमाणे) शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या निधीमधून सन. २०२४-२५ या आर्थिक वर्षात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत या लेखाशीर्षातून करण्यात येणार आहे. गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत ९० कामांना प्रशासकीय मान्यता दिली असून अशासकीय संस्थांचे ठरावानुसार अशासकीय संस्थेत काम वाटप करण्यास मान्यता दिली असल्याचे आ. दाते यांनी सांगितले आहे.
“शासनाच्या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” योजनेचा शेतकऱ्यांनी फार मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, गाळमुक्त झाल्याने तलावाची साठवण क्षमता वाढुन पाझराचे प्रमाण वाढेल, तालुक्यातील हजारो हेक्टर जमीन सुपीक होऊन भुगर्भातील पाणी पातळीत वाढ होईल. आ. काशिनाथ दाते, विधानसभा सदस्य.
COMMENTS