जामखेडमध्ये अनोख्या विवाहाचे कौतुक

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जामखेडमध्ये अनोख्या विवाहाचे कौतुक

मतिमंद तरूण आणि अपंग मुलीची बांधली लगीनगाठ

जामखेड/प्रतिनिधी : जामखेड तालुक्यातील खर्डा येथील सुरज भोसले या जन्मापासूनच मतिमंद मुलाचा विवाह भूम जिल्हा उस्मानाबाद येथील मुकुंद अंधारे यांची अपंग

वाळू माफियांकडून तहसीलदारांंस शिवीगाळ व धमकी
दीपक तनपुरे मराठा महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी
शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पिक विम्याचे निकष बदला

जामखेड/प्रतिनिधी : जामखेड तालुक्यातील खर्डा येथील सुरज भोसले या जन्मापासूनच मतिमंद मुलाचा विवाह भूम जिल्हा उस्मानाबाद येथील मुकुंद अंधारे यांची अपंग मुलगी प्रांजली यांचा एक आगळा वेगळा आदर्श निर्माण करणारा विवाह खर्डा येथील सिताराम मठाधिपती ह.भ.प. महालिंग महाराज नगरे व ह.भ.प. वायसे महाराज व मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडला.
खर्डा येथील शेतकरी राजू भोसले यांचा सुरज राजू भोसले हा जन्मापासूनच मतिमंद होता तसेच त्याचे हात व पायाची अवस्था ही अपंग असल्याने या मुलाचा विवाह होईल की नाही अशा संभ्रमावस्थेत त्याच्या कुटुंबीय होते, अशातच भांडगाव तालुका भूम जिल्हा उस्मानाबाद येथील मुकुंद अंधारे यांची मुलगी प्रांजली मुकुंद अंधारे इयत्ता 12 वी शिकलेली व एका पायाने अपंग असलेले सुंदर मुलीशी विवाहाचा योग जुळवून आला. या महत्त्वाच्या कामी कामात घनश्याम भोसले व सचिन अंधारे या तरुणांनी सामाजिक भान राखत दोन्ही कुटुंबीयां विषयी असणारी आस्था या ठिकाणी दाखवली. या सर्व घडामोडीत त्यांनी मोलाचे प्रयत्न करून या दोन्ही अपंगाचा विवाह जुळविला. सध्याच्या काळात अजूनही असंख्य तरुण विवाहाच्या प्रतीक्षेत आहे परंतु या दोन्ही अपंगाचे दोनाचे चार हात झाल्याने दोन्ही कुटुंब आनंदात असून तालूक्यात एक आदर्श विवाह झाल्याने कौतुक होत आहे.

COMMENTS