Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सर्वोत्तम शिष्य घडावेत याकरीता प्रमोदजी महाजन न्यू इंग्लिश स्कूलचे सातत्यपूर्ण प्रयत्न कौतुकास्पद – सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले

प्रमोदजी महाजन न्यू इंग्लिश स्कूलची मंथन परीक्षेत दमदार कामगिरी

अंबाजोगाई प्रतिनिधी - विद्यार्थी घडविण्याकरिता सर्व शाळा या प्रयत्न करीत असतात. परंतु, आपला विद्यार्थी हा शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिकदृष्ट्या स

 कंटेनर मधून आला ब्लॅक इग्वांना
सेवानिवृत्त पोलिस निरीक्षकास साडेसात लाख रुपयांचा गंडा
आठ नौदल अधिकार्‍यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती

अंबाजोगाई प्रतिनिधी – विद्यार्थी घडविण्याकरिता सर्व शाळा या प्रयत्न करीत असतात. परंतु, आपला विद्यार्थी हा शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिकदृष्ट्या सर्वोत्तम घडावेत याकरिता शाळांनी प्रयत्न केला पाहिजेत, याकामी प्रमोदजी महाजन न्यू इंग्लिश स्कूलचे सातत्यपूर्ण प्रयत्न कौतुकास्पद आहेत असे प्रतिपादन सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ तथा इंडीयन मेडीकल असोसिएशनचे सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ.राजेश इंगोले यांनी अंबाजोगाईत केले.
मंथन या विद्यार्थ्यांकरिता असलेल्या स्पर्धा परीक्षेत यश मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात डॉ.इंगोले हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी डॉ.राजेश इंगोले म्हणाले की, विद्यार्थी डॉक्टर, कलेक्टर, इंजिनिअर, वकील, न्यायाधीश, प्राध्यापक, शिक्षक हे घडविण्यासाठी तर प्रयत्न करावेत परंतु, सोबतच तो मानवी मूल्य असणारा माणूस म्हणून ही घडला पाहिजे, यासाठी शिक्षकांनी आणि शाळांनी प्रयत्न केले पाहिजेत. प्रमोदजी महाजन न्यू इंग्लिश स्कुल आपल्या विद्यार्थ्यांसाठी अथक परिश्रम घेत असून शाळेच्या प्राचार्य श्रीमती गीतांजली कुलकर्णी, योगेश कुलकर्णी यांच्या कल्पक दृष्टीकोनातून शाळा दिमाखदार वाटचाल करीत आहे. विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी घडावे याकरिता प्रत्येक शिक्षक प्रयत्न करीत असल्याने मंथन सारख्या विद्यार्थ्यांचा कस लावणार्‍या परीक्षांमध्ये तसेच विविध स्पर्धा परीक्षा, सांस्कृतिक स्पर्धांमध्ये या शाळेचे विद्यार्थी हे सातत्यपूर्ण आणि घवघवीत यश प्राप्त करीत असल्याचे गौरवोद्गार डॉ.राजेश इंगोले यांनी काढले. यावेळी बोलताना प्राचार्या गीतांजली कुलकर्णी यांनीमंथन परीक्षा 2021 – 22  प्रमोदजी महाजन न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग असे यश संपादन केले आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी यशाची परंपरा कायम ठेवत एकूण 19 विद्यार्थी गुणवत्ता धारक झाल्याची माहिती यावेळी दिली. यावेळी परीक्षेतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा डॉ.इंगोले यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले यांनी विद्यार्थ्यांना समायोचित मार्गदर्शन केले व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा ही दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुषमा सिद्धांती यांनी केले, तर उपस्थितांचे आभार रोहिणी राऊत यांनी मानले. या परीक्षेत उज्ज्वल यश मिळवलेल्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची नांवे पुढीलप्रमाणे आहेत – वर्ग इयत्ता पहिली – स्वराली औदुंबर राजमाने (राज्यात पाचवी), दिशा योगेशराव नागरगोजे (राज्यात सातवी), श्रुती उमेश इरलापल्ले (राज्यात सातवी), धीरज राजाभाऊ लटपटे केंद्रात पहिला, कार्तिकी श्रीरंग गवळी केंद्रात दुसरी, वर्ग इयत्ता दुसरी – श्रेयस गणेश पांचाळ केंद्रात पहिला, वर्ग इयत्ता 3 री – राधाराणी उमेश इरलापल्ले केंद्रात पहिली, श्रावणी शिवलींग राजमाने केंद्रात दुसरा, वर्ग इयत्ता 4 थी – श्रेया बालाजी मुंडे केंद्रात पहिली, अनुष्का गोविंद मुंडे केंद्रात दुसरी, सार्थक सचिन शिंदे हा केंद्रात दुसरा, वर्ग इयत्ता 5 वी – सोहम राजाभाऊ नलबे हा केंद्रात दुसरा ईशान राजेंद्र वडखेलकर हा केंद्रात दुसरा, वर्ग इयत्ता 6 वी – वृषाली विकास मुळे केंद्रात पहिली, श्रावणी अजय वाघाळकर केंद्रात दुसरी, वर्ग इयत्ता 7 वी – अपर्णा वैजेनाथ कराड केंद्रात पहिली, तर श्रेयस बालाजी मुंडे हा केंद्रात दुसरा, अमित अमोल डाके हा केंद्रात तिसरा, गुंजन दिपक टेकाळे केंद्रात 3 री आली आहे. विद्यार्थ्यांच्या या सुयशाबद्दल शाळेच्या मार्गदर्शिका श्रीमती रेखाताई महाजन, खा.सौ.पुनमताई महाजन – राव, संस्थापक अध्यक्षा सौ.मंगलताई कुलकर्णी, कार्यकारी अध्यक्ष कमलाकर कोपले, संस्थापक सचिव शैलेश कुलकर्णी, सदस्य आनंद जोशी, संजय फड, मुख्याध्यापिका सौ.गीतांजली कुलकर्णी व सर्व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन व कौतुक केले.

COMMENTS