Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विस्ताराधिकारी उज्वला गायकवाड यांची पुणे विभागात नियुक्ती

कर्जत/प्रतिनिधीः कर्जत पंचायत समितीतील शिक्षण विस्ताराधिकारी उज्वला गायकवाड यांची पुणे विभागीय स्तरावर शालार्थ पथक समिती सदस्य म्हणून नियुक्ती क

बाल विवाह लावल्याप्रकरणी सातजणांवर गुन्हा दाखल
अशोक’ चा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ संपन्न
बसच्या सीटखाली ठेवलेला दागिन्यांचा डबा लांबवला

कर्जत/प्रतिनिधीः कर्जत पंचायत समितीतील शिक्षण विस्ताराधिकारी उज्वला गायकवाड यांची पुणे विभागीय स्तरावर शालार्थ पथक समिती सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल गायकवाड यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम -2015 अन्वये नागरिकांना दिल्या जाणार्‍या सेवा पारदर्शक व वेळेत देणे सोयीस्कर होण्यासाठी शिक्षण आयुक्त यांनी या अधिनियमांतर्गत शिक्षण विभागातील प्रणालीत नाव नोंदणीची सुविधा अधिसूचित केली आहे. यासाठी समिती तयार करण्यात आली आहे. या समितीमध्ये उज्वला गायकवाड यांना नियुक्ती देण्यात आली आहे. सन-1990 मध्ये गायकवाड यांनी राशीन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून सेवा सुरु केली. त्यानंतर कुळधरण येथे 11 वर्षे तसेच कर्जत येथील मुलींच्या शाळेत 1 वर्षे सेवा केली. कर्जत पंचायत समितीत सर्वशिक्षा अभियानमध्ये 6 महिने सेवा केली.त्यानंतर गायकवाड यांना स्पर्धा परीक्षेतून शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून श्रीगोंदा पंचायत समितीत नियुक्ती मिळाली. त्यांनी कर्जत, श्रीरामपूर व जिल्हा परिषद मुख्यालय येथे शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून तसेच श्रीरामपूर व कर्जत येथे गटशिक्षणाधिकारी पदाचा पदभार सांभाळला. राज्यस्तरावर तज्ञ मार्गदर्शक म्हणून इंग्रजी विषय व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन याबाबत कामकाज केले. कर्जत येथे राज्यस्तरावरील मुलींचे शिक्षण कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य शिक्षण आयुक्त महावीर माने यांनी व महाराष्ट्र राज्य शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनीही उज्वला गायकवाड यांना उपक्रमशील विस्तार अधिकारी म्हणून सन्मानित केलेले आहे. उज्वला गायकवाड या कार्यक्षम,अभ्यासू अधिकारी म्हणून सर्वपरिचित आहेत. कर्जत विभागात 50 टक्के शाळा मॉडेल स्कूल बनवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
—————————

COMMENTS