Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मधमाशी मित्र पुरस्कारासाठी 6 मे पर्यंत अर्ज सादर करावेत

बीड प्रतिनिधी - जागतिक मधमाशापालन दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ मुंबई यांच्यावतीने मध संचालनालय महाबळेश्वर येथे मधमाशा पा

असली बेबंदशाही ओबीसी खपवून घेणार नाही ! 
डॉ. सिताराम कोल्हे यांना सहाय्यक पोलिस आयुक्तपदी बढती  
उन्हाच्या तडाख्यामुळे पारा 41 अंशांवर

बीड प्रतिनिधी – जागतिक मधमाशापालन दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ मुंबई यांच्यावतीने मध संचालनालय महाबळेश्वर येथे मधमाशा पालन क्षेत्रामध्ये काम करणार्‍या मधपाळ, प्रगती मधपाळ व संस्था यांना राज्यस्तरी मधमाशी मित्र पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी मधमाशा पालन क्षेत्रामध्ये मधमाशा पालन, मध प्रक्रिया व संबंधित इतर उत्पादने मधमाशा प्रजनन व उत्पादन व प्रचार प्रसिद्धी करणार्‍या उद्योजकास प्राधान्य दिले जाणार आहे.
 मधपाळकांनी पुरस्कारासाठी  विहित नमुन्यातील अर्ज महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ जिल्हा कार्यालय, बीड या कार्यालयातून किंवा 9420013748  या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधून प्राप्त करून घ्यावा. परिपूर्ण अर्ज 6 मे 2023 रोजी पर्यंत राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ जिल्हा कार्यालय, बीड येथे सादर करावेत, असे जिल्हा ग्राम उद्योग अधिकारी, बीड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

COMMENTS