Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

म्हाडाच्या 4 हजार 752 घरांसाठी बुधवारपासून अर्जविक्री

मुंबई : म्हाडाने आता अनेक बदलांसह आणि नव्या संगणकीय प्रणालीसह सोडत काढण्याची तयारी पूर्ण करून मंडळाने सोडतीचे वेळापत्रक निश्‍चित केले असून,  म्हा

विठुरायाच्या प्रसादाचा लाडू निकृष्ट दर्जाचा
कराड अर्बन बँकेची दीपावलीच्या तीनही दिवशी एटीएमद्वारे ग्राहक सेवा
‘महाज्योतीचे’ कार्यालय मराठवाड्यातील भटक्या विमुक्त व इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी साहयभूत – मंत्री विजय वडेट्टीवार

मुंबई : म्हाडाने आता अनेक बदलांसह आणि नव्या संगणकीय प्रणालीसह सोडत काढण्याची तयारी पूर्ण करून मंडळाने सोडतीचे वेळापत्रक निश्‍चित केले असून,  म्हाडा कोकण मंडळाच्या 4,752 घरांसाठी 10 मे रोजी सोडत काढण्यात येणार असून त्याची जाहिरात आज सोमवारी (6 मार्च) प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच बुधवार, 8 मार्चपासून अर्ज विक्री आणि स्वीकृतीला सुरुवात करण्यात येणार आहे, असे म्हाडाने जाहीर केले.

 मंडळाने सोडतीचे वेळापत्रक निश्‍चित केले होते. 11 एप्रिलला सोडत काढण्यात येणार होती. मात्र, अर्ज विक्री, स्वीकृती सुरू होण्यास दोन दिवस असतानाच संपूर्ण प्रकिया रद्द करण्यात आली होती. ‘प्रथम येणार्‍यास प्राधान्य’ या तत्वानुसार 14 भूखंड आणि काही घरे वगळण्याचे आदेश म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर यांनी दिल्याने सोडत पुढे ढकलावी लागली होती. पण आता मात्र सोडतीची तारीख अंतिम करण्यात आली आहे. सोडतीची जाहिरात सोमवारी प्रसिद्ध होणार असून बुधवारपासून अर्ज विक्री, स्वीकृतीस सुरुवात होईल, अशी माहिती मंडळाचे मुख्य अधिकारी मारुती मोरे यांनी दिली आहे.  सोडतीत ‘प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य’ योजनेत विरार – बोळींजमधील 2,048 घरांचा समावेश आहे. अल्प आणि मध्यम गटातील ही घरे आहेत. त्यांच्या किंमती 23 लाख ते 41 लाख रुपयांदरम्यान आहेत. कोकण मंडळाच्या सोडतीत अनेक वर्षांनंतर ‘प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य’ योजनेचा समावेश करण्यात आला आहे. विरार – बोळींजमधील ही घरे विकली जात नसल्याने हा उपाय योजण्यात आला आहे. या घरांची अर्ज विक्री, स्वीकृतीस 17 मार्चपासून सुरुवात होणार आहे. तर ऑनलाईन पद्धतीने तसेच ‘आरटीजीएस’ वा ‘एनईएफटी’द्वारे अनामत रक्कम भरून अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 12 एप्रिल आहे. अर्जदारांची प्रारूप यादी 27 एप्रिल रोजी, तर अंतिम यादी 4 मे रोजी प्रसिद्ध होईल. त्यानंतर 10 मे रोजी सोडत काढण्यात येईल.

COMMENTS