Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाच लाखाची लाच मागणारा एपीआय एसीबीच्या जाळ्यात

सोलापूर : गुन्हा दाखल न करण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी करणारा सहायक पोलिस निरीक्षक अर्थात एपीआय संजय मनोहर मोरे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागा

फुकट्या प्रवाशांकडून 11 लाखाचा दंड वसूल
ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्या गाडीवर शाईफेक
धावत्या रेल्वेतून उतरताना वकीलाचा मृत्यू

सोलापूर : गुन्हा दाखल न करण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी करणारा सहायक पोलिस निरीक्षक अर्थात एपीआय संजय मनोहर मोरे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. जागेच्या अनुषंगाने समोरील व्यक्तीने दिलेले तक्रार दाखल करून न घेण्यासाठी तक्रारदाराकडे तब्बल 5 लाखांच्या लाचेची मागणी केली. त्यातील पहिला हप्ता 3 लाख घेण्यास संमती दर्शविल्याने त्याला जेरबंद केले. सोलापूरच्या विजापूर नाका पोलिस ठाण्यात कार्यरत संजय मोरे यांच्याविरुद्ध तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाद मागितली होती. त्या अनुषंगाने बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली आहे. सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना मोरे याला लाचेचा मोह आवरला नाही हे विशेष. मोरे हे सध्या विजापूर नाका पोलिस ठाण्यात कार्यरत होता. त्यास त्याच्या घरातून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.

COMMENTS