Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अनुराग ठाकूर यांची क्रिकेट संग्रहालयाला भेट

पुणे ः माजी केंदीय मंत्री, भाजपचे वरिष्ठ नेते व बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी पुण्यातील सहकार नगर येथे असलेल्या ब्लेड्स ऑफ ग्लोरी या

मुख्याधिकारी ढोरजकर यांच्या तोंडाला काळे फासणार
झारखंड सभागृहातील गूंज !
अमर्त्य सेन यांना विश्‍वभारती विद्यापीठाची नोटीस

पुणे ः माजी केंदीय मंत्री, भाजपचे वरिष्ठ नेते व बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी पुण्यातील सहकार नगर येथे असलेल्या ब्लेड्स ऑफ ग्लोरी या सुप्रसिद्ध क्रिकेट संग्रहालयाला भेट दिली. यावेळी संग्रहालयाचे संस्थापक रोहन पाटे यांनी संग्रहालय स्थापन करण्यामागची भूमिका व येथील क्रिकेट वस्तूंचा संग्रह याविषयीची माहिती ठाकूर यांना दिली. संग्रहालय पाहून झाल्यावर आपल्या भावना व्यक्त करताना अनुराग ठाकूर म्हणाले, मी 17 वर्षांहून अधिक काळ क्रिकेट व्यवस्थापनात काम केले. मला देखील असे संग्रहालय साकारायचे होते, पण हे काम माझ्याकडून झाले नाही. ते काम रोहन पाटे यांनी करून दाखवले. या संग्रहालयात असलेल्या क्रिकेट मधील ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार असलेल्या कित्येक वस्तूंनी माझे लक्ष वेधून घेतले. अशा प्रकारचा संग्रह आणि तोही इतक्या मोठ्या प्रमणात एकाच ठिकाणी ही खूप वैशिट्यपूर्ण बाब असून असे संग्रहालय अजूनतरी माझ्या पाहण्यात आले नाही.

COMMENTS