मुंबई प्रतिनिधी - प्रसिद्ध फिल्ममेकर आणि अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप हिने काही महिन्यांपूर्वी बॉयफ्रेंड शेन ग्रेगोयरसोबत परदेशात साखरपुडा

मुंबई प्रतिनिधी – प्रसिद्ध फिल्ममेकर आणि अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप हिने काही महिन्यांपूर्वी बॉयफ्रेंड शेन ग्रेगोयरसोबत परदेशात साखरपुडा केला होता.शेनने अंगठी घालून आलियाला लग्नासाठी प्रपोज केले. परदेशात साखरपुडा केल्यानंतर या जोडप्याने काल म्हणजेच ३ ऑगस्टला मुंबईत हिंदू रितीरिवाजांनी साखरपुडा केला. आलिया कश्यपच्या एंगेजमेंटला अनेक सिनेस्टार्सही हजेरी लावत आहेत. आलियाचा साखरपुड्याचा लुकआलिया आणि शेनच्या साखरपुडा सोहळ्यात आलिया कश्यप आणि शेन ग्रेगोयर यांनी खास लुक केला होता. आलियाने तिच्या एंगेजमेंटमध्ये ऑफ-व्हाइट लेहेंगा घातला आहे, ज्यावर बहुरंगीत एम्ब्रॉयडरी आहे. तर शेन ग्रेगोयरही आपल्या होणाऱ्या बायकोला मॅचिंग कपडे परिधान करताना दिसला. शेनने ऑफ व्हाइट कलर मॅचिंगची शेरवानी घातली आहे. दोघांनी मीडियासमोर पोज दिली. वयाच्या २२ व्या वर्षी केला साखरपुडाआलियाचे फक्त 22 वर्षांची आहे. तिने अगदी लहान वयातच आयुष्याचा जोडीदार निवडला आहे. या वयात एंगेज झाल्यामुळे आलिया खूप खूश आहे. आलियाचे वडील आणि फिल्ममेकर अनुराग कश्यप सुद्धा लेकीच्या साखरपुड्यात खुश होते.
COMMENTS