Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात लव्ह जिहादविरोधी कायदा विचाराधीन

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मुंबई/प्रतिनिधी ः मागील काही दिवसांत लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांविरोधात बहुसंख्य समाजाचे लाखोंच्या संख्येने मोर्चे निघत असतील, तर त्याकडे दुर्लक्

टेंभूच्या पाणी योजनातून हजारो हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार; आगामी काळात प्रभाकर देशमुखांच्या नेतृत्वाखाली माण-खटावचे प्रश्‍न मार्गी लावणार : ना. अजित पवार
नोकरीच्या शोधात निघालेल्या तरुणीला बसने चिरडले | LOKNews24
मनात भीती न ठेवता नियमित आरोग्य तपासणी करणे ही काळाची गरज – नमिता मुंदडा

मुंबई/प्रतिनिधी ः मागील काही दिवसांत लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांविरोधात बहुसंख्य समाजाचे लाखोंच्या संख्येने मोर्चे निघत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. लव्ह जिहाद आणि धर्मांतरामागे एक डिझाईन दिसत आहे. मागील काही काळात महाराष्ट्रात आमिष दाखवून धर्मांतर झाल्याचे, तसेच लव्ह जिहादच्या घटना घडल्याचे बाहेर आले आहे. वस्तुस्थितीचा अभ्यास करून याविषयीची कायदे आणण्यासाठी सरकार विचाराधीन आहे, अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.
महाराष्ट्रातील लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांच्या घटना रोखण्यासाठी महाराष्ट्रात कायदा करावा, अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे याबाबत लक्ष वेधले. यावरील चर्चेत सर्वपक्षीय आमदारांनी सहभाग घेतला. देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी शासनाची भूमिका सभागृहात स्पष्ट केली. ‘लव्ह जिहाद’ हा शब्द महाराष्ट्राने आणलेला नाही. सर्वोच्च न्यायालयातही याविषयी चर्चा झाली आहे. लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायद्यासाठी राज्यात 40 मोर्चे काढण्यात आले. यातून शासनाला याचे गांभीर्य समजले आहे. समाजाची भावना शासनाने लक्षात घेतली आहे. याविषयी विविध राज्यांत असलेल्या कायद्यांचा अभ्यास करून आपल्याकडे कशा प्रकारे कायदा केला पाहिजे, याचा अभ्यास करून निर्णय घेण्यात येईल, असे फडणवीस म्हणाले. आमिष दाखवून धर्मांतर झाल्यास त्यासाठी भादंवि मधील 420 (फसवणूक) नुसार गुन्हा नोंदवला जातो; परंतु भादंविमधील 420 कलम धर्मांतरासाठी करण्यात आलेले नाही. अशा वेळी विशेष कायदा करावा लागतो. धर्मांतराच्या घटना घडत आहेत. त्यामुले राज्यघटनेच्या चौकटीत राहून हा प्रश्‍न सोडवण्यासाठी कायदा तयार करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे, असे या वेळी फडणवीस म्हणाले.

अंधश्रद्धा निमूर्लनप्रमाणे कायदा करावा ः पडळकर
राज्यात अंधश्रद्धा निर्मूलनासाठी जसा कायदा करण्यात आला, त्याप्रमाणे ‘धर्मांतर’ आणि ‘लव्ह जिहाद’ यांसाठीही कायदा करण्यता यावा. ख्रिस्ती फादर थेट येशूशी बोलल्याचे दाखवून ‘कॅन्सर’ बरा करत असल्याचे सांगतात. यातून धर्मांतर केले जाते. ‘जिहाद’ हा अरबी शब्द. धर्मांध मुसलमान प्रेमाच्या नावाने हिंदु मुलींचे धर्मांतर करतात याला ‘लव्ह जिहाद’ म्हणतात. धर्मांधांचे हे षड्यंत्र गावागावांत पोचले आहे.  

COMMENTS