Homeताज्या बातम्यादेश

दिल्लीतील पाच मेट्रो स्टेशनच्या भितींवर भारत विरोधी घोषणांमुळे खळबळ

नवी दिल्ली/प्रतिनिधी : भारतात पुढील महिन्यात 9 ते 10 सप्टेंबरला जी-20 संमेलनाचे आयोजन होणार आहे. त्याआधी राजधानी दिल्लीमध्ये वातावरण दुषित करण्या

भररस्त्यात चाकुने वार करत तरुणाची हत्या.
सभापती धनखड सरकारचे प्रवक्ते : खरगे यांचा हल्लाबोल
कावड यात्रेवर हल्ल्याची शक्यता, सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली/प्रतिनिधी : भारतात पुढील महिन्यात 9 ते 10 सप्टेंबरला जी-20 संमेलनाचे आयोजन होणार आहे. त्याआधी राजधानी दिल्लीमध्ये वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न सुरु आहे. राज्यात कडक सुरक्षा व्यवस्था असताना दिल्लीच्या अनेक मेट्रो स्टेशनच्या भिंतींवर काळ्या रंगात भारत विरोधी आणि खलिस्तानच्या समर्थनात घोषणा लिहिण्यात आल्या आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
दिल्ली पोलिसांनी रविवारी यासंदर्भातील माहिती दिली. दिल्लीच्या पाच मेट्रो स्टेशनवर काहींनी ’दिल्ली खलिस्तान होईल’ आणि ’खलिस्तान जिंदाबाद’ असा आशयाच्या घोषणा लिहिल्या होत्या. दिल्ली पोलिसांनी याविरोधात कायदेशीर कारवाई सुरु केली आहे. दाव्यानुसार, या प्रकारामागे बंदी घातलेली संघटना शीख फॉर जस्टिस हिचा हात आहे. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, जी-20 संमेलनाच्या आधी शीख फॉर जस्टिसने दिल्ली मेट्रो स्टेशनांवरील रॉ फुटेज जारी केलाय.

COMMENTS