Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्मशानभूमीत पार पडला आगळा वेगळा विवाह सोहळा

अहमदनगर -अहमदनगर जिल्ह्यातील राहाता शहरातील स्मशानभूमीत एका जोडप्याने थाटामाटात लग्न करत आपल्या सहजीवनाची सुरूवात केली आहे. ज्या स्मशानभूमीत आयु

आगामी वर्षातील चातुर्मासचे आयोजन जामखेडला करावे
राहुरी शहरात शांतता राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे : पालकमंत्री विखे
राज्यपालांचा गैरसमज झाल असावा : महसूल मंत्री थोरात

अहमदनगर –अहमदनगर जिल्ह्यातील राहाता शहरातील स्मशानभूमीत एका जोडप्याने थाटामाटात लग्न करत आपल्या सहजीवनाची सुरूवात केली आहे. ज्या स्मशानभूमीत आयुष्याचा शेवट होतो तिथेच या जोडप्याने आपल्या सहजीवनाची सुरूवात केली आहे.  स्मशानभूमीत गेल्या 20 वर्षापासून काम करणारे गंगाधर गायकवाड यांनी आपल्या मुलीचा विवाह स्मशानभूमीतच लावला. स्मशानभूमीला अनेकजण अशुभ मानतात, मात्र याच स्मशानभूमीत विवाहाचे सर्व संस्कार पार पडले. अगदी थाटामाटात दोघांचा विवाह लावण्यात आला. विषेश म्हणजे जातीपातीची बंधने झुगारून सुशिक्षित तरूणाने म्हसनजोगी समाजातील मुलीशी विवाह करून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. मनोज जयस्वाल आणी मयुरी गायकवाड यांच्या विवाहासाठी शहरातील मान्यवरही उपस्थित होते, त्यांनी नवविवाहित जोडप्याला भावी आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. पिपाडा दामपत्यानेही कन्यादान करत मुलीला संसार उपयोगी भांडी भेट दिली

COMMENTS