Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोटारसायकल चोरणारी दुसरी टोळी जेरबंद

राहुरी तालुक्यात मोटारसायकल चोरीचे जाळे सक्रिय

देवळाली प्रवरा ः राहुरी तालुक्यातील मोटारसायकल चोरी करणारी दुसरी टोळी पोलिसांच्या हाथी लागली असुन मोटार सायकलची चोरी करणार्‍या 7 जणाच्या टोळीतील

कोपरगाव सोसायटीच्या सभासदांना पंधरा टक्के लाभांश ः  वैभव आढाव
तक्रारीची दखल न घेतल्याने महावितरणला आर्थिक दंड
येवल्यात कांदा व्यापाऱ्याने शेतकऱ्याला केली मारहाण l पहा LokNews24

देवळाली प्रवरा ः राहुरी तालुक्यातील मोटारसायकल चोरी करणारी दुसरी टोळी पोलिसांच्या हाथी लागली असुन मोटार सायकलची चोरी करणार्‍या 7 जणाच्या टोळीतील 5 आरोपींना गजाआड करण्यात राहुरी पोलिसांना यश आले असून यातील 3 आरोपी चोरीच्या मोटारसायकलचे सुटे भाग करुन विक्री करीत असल्याचे निष्पन्न झाले. ते तिघे मोटारसायकल गॅरेज मालक आहेत. या टोळीकडून 7 मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.
           याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील वाढत्या मोटरसायकलच्या चोरींवर प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने तसेच चोरीस गेलेल्या मोटरसायकल शोधकामी स्थानिक गुन्हे शाखा पथकाने मागील आठवड्यात विजपंप चोरीतील पाच आरोपींकडून 11 मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. खबर्‍या मार्फत मोटारसायकल चोरीच्या दुसर्‍या टोळीची माहिती मिळाल्या नंतर सीसीटीव्ही फुटेज वरुन खाञी करुन घेतल्या नंतर राहुरी पोलिसांनी मोटरसायकल चोरणारे विशाल प्रभाकर साठे व बबलू बाळासाहेब बर्डे (रा.ब्राह्मणी ता.राहुरी) यांना ताब्यात घेतल्या घेवून चौकशी केली असता सुरवातीला उडवाउडवीचे उत्तर दिल्याने पोलिसांनी पोलिस खाक्या दाखवताच दोन्ही आरोपींनी मोटारसायकल चोरी गुन्हा कबुल करुन 7 मोटारसायकली पोलिसांना काढुन दिल्या आहेत. चोरलेल्या मोटारसायकलचे सुटे भाग करुन इतर मोटारसायकला बसविण्याचे काम  करणार्‍या 3 गँरेज चालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.त्यामध्ये रवी राघू सूर्यवंशी, कोहिनूर सोपान पवार, सोमनाथ सुरेश वैरागर,(सर्व रा.ब्राह्मणीता.राहुरी) यांचा समावेश आहे.मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील दोन व तिन गँरेज चालक अशा पाच जणांना अटक करुन राहुरी न्यालयात हजर केले असता न्यायालयाने 6 दिवसाची पोलिस कस्टडी दिली आहे.दरम्यान अटक केलेल्या सात आरोपीकडून सात मोटरसायकली ज्यांचे नंबर इंजिन नंबर , चेसिस नंबर वेगवेगळे असलेल्या जप्त करण्यात आल्या आहेत. सदर गुन्ह्यातील फरार आरोपी अशोक रखमाजी पिंपळे (रा.मानोरी ता.राहुरी), कृष्णा संजय वैरागर (रा.ब्राह्मणी ता.राहुरी) यांचा राहुरी पोलीस शोध घेत आहेत. सदर कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलिस अधीक्षक वैभव कुलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर विभाग बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस स्टेशनचे  पोलीस निरीक्षक संजय आर.ठेंगे यांच्या नेतृत्वात सपोनी देवेंद्र शिंदे,सपोनी रविंद्र पिंगळे,पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील, चालक पोलीस हवालदार शाकुर सय्यद, पोलीस नाईक प्रवीण अहिरे, पो.हे.काँ.सुरज गायकवाड, प्रवीण बागुल , विकास साळवे, सतीश आवारे,बाबासाहेब  शेळके, पो. कॉ. प्रमोद ढाकणे, अंकुश भोसले, सतीश कुर्‍हाडे, सचिन ताजणे, आदिनाथ पाखरे, नदीम शेख, गोवर्धन कदम, रोहित पालवे,गणेश लिपणे, अमोल भांड, मोबाईल सेल श्रीरामपुरचे पो.ना. सचिन धनाड,पो.ना. संतोष दरेकर यांनी केली आहे पुढील तपास सहाय्यक फौजदार तुळशीराम गीते हे करत आहेत.

गॅरेज मालकांना आवाहन – राहुरी पोलीस स्टेशन कडून सर्व गॅरेज चालक यांना आवाहन करण्यात येते की आपल्याकडे कुठलीही चोरीची गाडीचे इंजिन किंवा कुठले स्पेअर बदलून द्या अशी मागणी करत असेल तर आपण तात्काळ राहुरी पोलीस स्टेशनची संपर्क करावा. सदर गाडीच्या मालकी हक्काबाबत खात्री करूनच गाडी दुरुस्तीचे काम करावे. कुठल्याही गाडीचे चेसी नंबर वेगळे व इंजिन नंबर वेगळे अशा प्रकारे असेंबलींग करून देऊ नये. चोरीच्या गाडीचे चेसिस नंबर इंजिन नंबर गाडी पकडल्या जाऊ नये या उद्देशाने बदलून दिल्यास कारवाई करण्यात येईल.

COMMENTS