Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुख्यमंत्री ‘लाडकी बहीण योजने’साठी पुन्हा मुदतवाढ

15 ऑक्टोबरपर्यंत करता येणार अर्ज

मुंबई : राज्य सरकारची महत्वकांक्षी असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी आणखी मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी या योजनेसाठी अर

राजपूत करणी सेनेच्या अध्यक्षांची हत्या
उसाला तोड मिळत नसल्याने शेतकर्‍याने स्वतःला संपवले
राज्य सरकार भ्रष्टाचार करत आहे…देवेंद्र फडणवीसांचा टोला (Video)

मुंबई : राज्य सरकारची महत्वकांक्षी असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी आणखी मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत सप्टेंबर अखेरपर्यंत होती. पण ती आता 15 ऑक्टोबर रात्री बारा वाजेपर्यंत करण्यात आली आहे. राज्यातील ज्या महिलांना योजनेचा लाभ मिळाला नाही, त्यांच्यासाठी ही मुदतवाढ करण्यात आली आहे. पुढील चार दिवसांत अर्ज करुन या योजनेचा लाभ महिलांना घेता येईल. परंतु, 15 ऑक्टोबरपर्यंत भरावयाचे अर्ज हे केवळ अंगणवाडी सेविकांमार्फतच भरावे लागणार आहेत.
लाडकी बहीण योजनेच्या मुदतवाढीबाबत शासनाकडून सूचना प्राप्त झाली आहे. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेचे अर्ज करण्यासाठी 15 ऑक्टोबर 2024 च्या रात्री बारा वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. मात्र, हे अर्ज फक्त अंगणवाडी सेविकांमार्फतच भरण्यात यावेत, असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS