मध्य प्रदेश - मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमधून मंगळवारी पुन्हा एकदा वाईट बातमी आली आहे. दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या ‘तेजस’ या नर चित्त्याचा
मध्य प्रदेश – मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमधून मंगळवारी पुन्हा एकदा वाईट बातमी आली आहे. दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या ‘तेजस’ या नर चित्त्याचा मृत्यू झाला आहे. कुनो पार्क व्यवस्थापनाच्या निरीक्षणादरम्यान हा चित्ता जखमी अवस्थेत आढळून आला. त्याच्या मानेच्या वरच्या भागात जखमा दिसून आल्या होत्या. कुनो नॅशनल पार्कमध्ये आतापर्यंत 4 चित्ता आणि 3 शावकांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास देखरेख पथकाला ‘तेजस’ या नर चित्ताच्या मानेच्या वरच्या भागावर जखमेच्या खुणा दिसल्या. मॉनिटरिंग टीमने पालपूर मुख्यालयात उपस्थित असलेल्या प्राण्यांच्या डॉक्टरांना ही माहिती दिली. प्राण्यांच्या डॉक्टरांनी घटनास्थळी जाऊन तेजस चित्ताची तपासणी केली असता जखम गंभीर असल्याचे दिसून आले. यानंतर तेजसला बेशुद्ध करून उपचारासाठी पाठवण्यात आले. घटनास्थळी पोहोचलेल्या डॉक्टरांना दुपारी दोनच्या सुमारास ‘तेजस’ मृतावस्थेत आढळून आला. सध्या तेजसला झालेल्या दुखापतींबाबत तपास सुरू आहे. त्याशिवाय, त्याचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. कुनो नॅशनल पार्कमधून गेल्या दोन महिन्यांत 3 चित्त्यांचा मृत्यू झाला आहे. सिया (ज्वाला) चित्ताने 24 मार्च रोजी 4 शावकांना जन्म दिला होता, मात्र आतापर्यंत यातील तीन शावकांचा मृत्यू झाला आहे. आता कुनो पार्कमध्ये 16 प्रौढ चित्ता आणि 1 शावक आहे. वन्यजीव तज्ज्ञांनीही वारंवार होणाऱ्या मृत्यूंबाबत चिंता व्यक्त केली आहे
COMMENTS