मध्य प्रदेश - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा गाजावाजा करुन दक्षिण आफ्रिकेतून भारतात २० चित्ते आणले होते. मात्र यातल्या तिसऱ्या चित
मध्य प्रदेश – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा गाजावाजा करुन दक्षिण आफ्रिकेतून भारतात २० चित्ते आणले होते. मात्र यातल्या तिसऱ्या चित्त्याचा मृत्यू झाला आहे. दक्षिण आफ्रिकेतून आणि नामिबियातून मध्य प्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये मागच्या वर्षी २० चित्ते आणण्यात आलेले होतं. मार्च आणि एप्रिल महिन्यात यातील दोन चित्ते मरण पावले. आता तिसऱ्या चित्त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. चित्त्यांना कुंपनाबाहेर सोडण्यात आलेलं होतं. मेटिंगदरम्यान दोन चित्त्यांचं भांडण झालं. त्यात एका चित्त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत पावलेल्या मादी चित्त्याचं नाव दक्षा असं होतं.कुना राष्ट्रीय उद्यानात आतापर्यंत तीन चित्त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे कुनो नॅशनल पार्क प्रशासनात खळबळ उडाली. अधिकाऱ्यांना प्रथमच दोन चित्त्यांमधली झुंज पाहिली. ही घटना दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. भारतातील चित्ता प्रकल्पासाठी नामिबियातून आठ आणि दक्षिण आफ्रिकेतून १२ चित्ते आणण्यात आले होते. सर्वात आगोदर नामिबियातून आणलेल्या चित्त्याचा रोगामुळे मृत्यू झाला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या चित्त्याचा मृत्यू झाला. आता हा तिसरा मृत्यू. सध्या कुनो नॅशनल पार्कमध्ये १७ मोठे चित्ते आहेत. याशिवाय त्यांना चार पिल्लंदेखील आहेत. पाच चित्ते खुल्या जंगलामध्ये सोडण्यात येणार आहेत, असं वन आणि पर्यावरण मंत्रालयाने आधीच सांगितलं होतं. त्यानुसार चित्ते सोडण्यात आले. मात्र नंतर आपसातील हल्ल्यामुळे मादी चित्त्याचा मृत्यू झाला आहे
COMMENTS