Homeताज्या बातम्यादेश

कुनो नॅशनल पार्कमध्ये आणखी एका चित्त्याचा मृत्यू

भोपाळ : मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या आणखी एका चित्त्याचा मृत्यू झालाय. उदय असे या चित्त्याचे नाव असून  23 एप्

लिनेस क्लबचे अध्यक्षपदी रोशनी भट्टड यांची निवड
भाजप नेते गिरीश महाजनांच्या अडचणीत वाढ ; पुणे पोलिसांची छापेमारी
फलटण तालुक्यात वाघाटी मांजराचा वावर; मादीसह तीन पिल्लांचे दर्शन

भोपाळ : मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या आणखी एका चित्त्याचा मृत्यू झालाय. उदय असे या चित्त्याचे नाव असून  23 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास या चित्त्याचा मृत्यू झाला. मागील काही दिवसांपूर्वी कुनो पार्कमध्ये मादी चित्ता साशा हिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता उदय या चित्त्याचा मृत्यू झाला आहे.
वन विभागाच्या अधिकार्‍यांना दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (23 एप्रिल) सकाळी 9 वाजेच्या सुमारास चित्ता उदय मान खाली घालून जमिनीवर पडलेला दिसून आला. त्याच्याजवळ गेल्यानंतर तो लंगडत चालताना दिसला. त्यानंतर याची सूचना वन्यप्राणी चिकित्सकांना देण्यात आली. त्यानंतर उदयची तपासणी केल्यानंतर तो आजारी असल्याचे दिसून आले. उदयला उपचारासाठी ट्रॅकुलाइज केले. त्यानंतर बेशुद्ध करुन त्याच्यावर उपचार सुरु केले होते. मात्र, उदयची प्रकृती पाहून त्याला पुढील उपाचर आणि निरीक्षणासाठी आयसोलेशन वार्डात ठेवले होते. परंतु, दुपारी  4 वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. या चित्त्याचा मृत्यू  नेमका कशामुळं झाला याबाबतची माहिती अद्याप मिळाली नाही. विन विभागाच्या अधिकार्‍यांना दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (23 एप्रिल) सकाळी 9 वाजेच्या सुमारास चित्ता उदय मान खाली घालून जमिनीवर पडलेला दिसून आला. त्याच्याजवळ गेल्यानंतर तो लंगडत चालताना दिसला. त्यानंतर याची सूचना वन्यप्राणी चिकित्सकांना देण्यात आली. त्यानंतर उदयची तपासणी केल्यानंतर तो आजारी असल्याचे दिसून आले. उदयला उपचारासाठी ट्रॅकुलाइज केले. त्यानंतर बेशुद्ध करुन त्याच्यावर उपचार सुरु केले होते. मात्र, उदयची प्रकृती पाहून त्याला पुढील उपाचर आणि निरीक्षणासाठी आयसोलेशन वार्डात ठेवले होते. परंतु, दुपारी  4 वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. या चित्त्याचा मृत्यू  नेमका कशामुळं झाला याबाबतची माहिती अद्याप मिळाली नाही.

चित्त्याच्या मृतदेहाचे श्‍वविच्छेदन केले जाणार आहे. त्यानंतरच त्याच्या मृत्यूचे नेमके कारण कळू शकणार आहे. दक्षिण आफ्रिकेतून भारतात आणलेल्या 20 चित्त्यांपैकी आता 18 चित्ते उरले आहेत. दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या 8 चित्त्यांना गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांच्या वाढदिवसानिमित्त कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले होते. यातील दोन चित्त्यांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे.
जे. एस. चौहान, प्रधान मुख्य वनसंरक्षक

COMMENTS