Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलिस अधीक्षक कार्यालयात पुन्हा आत्मदहनाचा प्रयत्न

दिव्यांग व्यक्तीविरुद्ध गुन्हा

अहमदनगर/प्रतिनिधी ः येथील जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर सोमवारी (3 एप्रिल) सायंकाळी पाच वाजता एका दिव्यांग व्यक्तीने दोन मुलांसह आत्मदहन करण

नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर अकोल्यात जल्लोष
शनिवारी भरणार राज्यातील पहिली मैदानी लोकशाळा
Ahmednagar : मनसेच्या वतीने शासकीय परिपत्रकाची होळी l Lok News24

अहमदनगर/प्रतिनिधी ः येथील जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर सोमवारी (3 एप्रिल) सायंकाळी पाच वाजता एका दिव्यांग व्यक्तीने दोन मुलांसह आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. स्वागत कक्षातील महिला पोलिसांनी प्रसंगावधान राखत संबंधित व्यक्तीच्या हातातील पेट्रोलची बाटली काढून घेतल्याने मोठा अनर्थ टळला. संबंधित दिव्यांग व्यक्तीवर तोफखाना पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

या दिव्यांग व्यक्तीच्या तक्रारीबाबत संबंधित व्यक्ती तोफखाना पोलिस ठाणे येथे गेली असता तेथील पोलिस अंमलदारांनी दाद न देता लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत शिवीगाळ केल्याचा आरोप करीत जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर दोन मुलांसह आत्मदहनाचा प्रयत्न केला. तसेच मोठमोठ्याने आरडा ओरडा केला. गोंधळाचा आवाज ऐकून स्वागत कक्षातील महिला पोलिसांनी धाव घेतली तसेच उपनिरीक्षक समाधान सोळंके यांच्यासह पोलिसांनी या व्यक्तीची समजूत काढली. मारहाण करणार्‍या संबंधित अंमलदारांवर गुन्हा दाखल करा नाही तर आत्मदहन करणारच असा इशारा दिल्यानंतर गुन्हा दाखल करू असे सांगितले गेले. त्यास भिंगार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

COMMENTS