Homeताज्या बातम्याविदेश

गाझापट्टीत पुन्हा हल्ला, 50 पॅलेस्टिनींचा मृत्यू

जेरूसेलम ः इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सुरू असलेले युद्ध अजूनही संपण्याची चिन्हे नाहीत. रविवारी या युद्धाचा 28 वा दिवस असून, इस्रायलने गाझापट्ट

पाटण तालुक्यात पत्रकार दिनी ऊसतोड मजुरांच्या बालकांना खाऊ वाटप
खा. वाकचौरे यांनी घेतली माजी मंत्री गडाख यांची भेट
टँकरने 2 शाळकरी मुलींना चिरडले

जेरूसेलम ः इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सुरू असलेले युद्ध अजूनही संपण्याची चिन्हे नाहीत. रविवारी या युद्धाचा 28 वा दिवस असून, इस्रायलने गाझापट्टीवर हवाई हल्ला तीव्र केला आहे. सेंट्रल गाझामधील माघाझी निर्वासित छावणीमध्ये इस्रायलने हवाई हल्ला केल्याने जवळपास 51 पॅलेस्टाईन नागरिक ठार झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक महिला आणि मुलांचा समावेश आहे. इस्रायल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) ने संपूर्ण गाझावर बॉम्बफेक चालूच ठेवली आणि गाझा पट्टीच्या उत्तरेकडील भागात हल्ले तीव्र केले. या हल्ल्यांमध्ये अनेक निवासी घरेही उद्ध्वस्त झाली. इस्रायलच्या भूदलानेही गाझामधील हमासला लक्ष्य करून हल्ले चालूच ठेवले आहेत. गाझामधील हमास संचालित आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, गेल्या काही दिवसांत इस्रायलकडून झालेल्या हल्ल्यात किमान 231 लोक मारले गेले आहेत. यामुळे युद्धातील एकूण मृतांची संख्या 9 हजार 488 झाली आहे. मृतांमध्ये 3 हजार 900 मुले असून 1509 महिलांचा समावेश आहे. गाझा अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार 24 हजारांहून हून अधिक लोक जखमी झाले आहेत. तर वेस्ट बँक प्रदेशात इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षात किमान 140 जण ठार झाले आहेत.

COMMENTS