Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात होणार आणखी एक युती? नाना पटोले यांचं सूचक विधान

वंचितकडून प्रस्ताव आल्यास त्यावर नक्कीच विचार करू याच पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे

बुलढाणा प्रतिनिधी  - वंचित बहुजन विकास आघाडीने 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपली दखल घेण्यास भाग पाडले. त्यामुळे आतापासूनच वंचित आणि काँग्रेसच

मुख्यमंत्र्यांना चेष्टा-मस्करी करण्याची सवय… नाना पटोलेंची मिश्किल प्रतिक्रिया
मंत्री नव्हे, पंतप्रधानच बदलण्याची गरज नाना पटोले l DAINIK LOKMNTHAN
कोरडवाहूला एकरी 25 तर बागायतीला 50 हजारांची मदत द्या

बुलढाणा प्रतिनिधी  – वंचित बहुजन विकास आघाडीने 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपली दखल घेण्यास भाग पाडले. त्यामुळे आतापासूनच वंचित आणि काँग्रेसच्या युतीची चर्चा रंगली आहे. मात्र, अजून युती संदर्भात वंचितकडून कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. वंचितकडून प्रस्ताव आल्यास त्यावर नक्कीच विचार करू, अशी सूचक प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) यांनी दिली. कोरोनामुळे रखडलेल्या निवडणुका लवकरच राज्यात पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी कडून काँग्रेसला प्रस्ताव पाठवला आहे, ‘त्यांच्याकडून कुठल्याही चर्चेसाठी निमंत्रण नाही, असं वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं होतं. यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली.

COMMENTS