Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महामार्गावरील पुलाच्या खड्ड्यात पुन्हा अपघात

चारचाकी कोसळली, तिघेजण बालंबाल बचावले

लातूर प्रतिनिधी - जहिराबाद राष्ट्रीय महामार्गावरील औराद शहाजानी येथील शेळगी मोड येथे पुलाचे अर्धवट खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे तिथे मोठा खड

अपघातात महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानाचा मृत्यू
गॅस लिक होऊन घरगुती सिलेंडरचा स्फोट.
एक्सप्रेसवर कंटेनरचा झाला ब्रेक फेल

लातूर प्रतिनिधी – जहिराबाद राष्ट्रीय महामार्गावरील औराद शहाजानी येथील शेळगी मोड येथे पुलाचे अर्धवट खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे तिथे मोठा खड्डा निर्माण झाला आहे. दरम्यान, शनिवारी पहाटेच्या अवकाळी पावसात समोरील खड्डा न दिसल्याने त्यात चारचाकी वाहन उलटले. सुदैवाने सर्वजण बालंबाल बचावले.
लातूर- जहिराबाद महामार्गावरील निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील शेळगी मोड येथे पुलासाठी अर्धवट खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे येथे मोठा खड्डा निर्माण झाला आहे. शनिवार पहाटे या खड्ड्यात एमएच 18, डब्ल्यू 6410 ही कोसळली. या कारमध्ये जळगाव येथील व्यापारी संस्कार मेहता, गणेश गवळी व चालक असे तिघेजण होते. हे सर्वजण बालंबाल बचावले आहे. विशेष म्हणजे, गत आठवड्यात एक जोडपे दुचाकीसह या खड्ड्यात पडले होते. त्यात ते जखमी झाले. तसेच यापूर्वीही काही वाहने या खड्ड्यात पडली. त्यात काहीजण जखमी झाले. संबंधित गुत्तेदाराने या खड्ड्याभोवती कुठलेही बॅरिकेटस् अथवा सूचना फलक लावले नाहीत. त्यामुळे या घटना घडत आहेत. याकडे एमएसआरडीसीने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

COMMENTS