Homeताज्या बातम्यादेश

जपानमध्ये पुन्हा 6.1 रिश्टर स्केलचा भूकंप

टोक्यो : जपान पुन्हा एकदा जोरदार भूकंपाने हादरला आहे. उत्तर जपानमधील इवाते आणि आओमोरी प्रांतात मंगळवारी भूकंपाचा धक्का बसला आहे. या भूकंपाची तीव्

महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यात भूकंप  
साताऱ्यात भूकंपाचे सौम्य धक्के
लातूर पुन्हा हादरलं, 3 दिवसात दुसऱ्यांदा भूकंपाचा धक्का

टोक्यो : जपान पुन्हा एकदा जोरदार भूकंपाने हादरला आहे. उत्तर जपानमधील इवाते आणि आओमोरी प्रांतात मंगळवारी भूकंपाचा धक्का बसला आहे. या भूकंपाची तीव्रता 6.1 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली. जपानच्या हवामान संस्थेच्या हवाल्याने रॉयटर्सच्या वृत्तानुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू इवाते प्रांताचा उत्तर किनारपट्टी भाग होता. जपानी मीडियाच्या वृत्तानुसार, सध्या या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याची माहिती नाही. हवामान खात्याने सुनामीबाबत कोणताही इशारा दिला नसल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला आहे.

COMMENTS