Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छोटेवाडी येथे अण्णाभाऊ साठे महोत्सव!

बीड प्रतिनिधी - माजलगाव तालुक्यातील छोटेवाडी येथील जयभिम महोत्सवाने एक आदर्श निर्माण केला आहे. ग्रामीण भागातली आदर्श जयंती म्हणून लौकिक मिळविला

नाल्याच्या पुरात बैल गाडी वाहून गेल्याचे थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद.
क्रिकेटवर सट्टा लावणार्‍यांना अटक
निसर्गाचा प्रकोपापेक्षा व्यसनमुक्तरहाणे आपल्या हातात : हभप बंडातात्या कर्‍हाडकर

बीड प्रतिनिधी – माजलगाव तालुक्यातील छोटेवाडी येथील जयभिम महोत्सवाने एक आदर्श निर्माण केला आहे. ग्रामीण भागातली आदर्श जयंती म्हणून लौकिक मिळविला आहे. त्याच धर्तिवर आता साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव साजरा होतो आहे. या जयंतीच्या तयारीसाठी महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. सदरील बैठक छोटेवाडी येथील महापुरुष नगर येथे बुधवार (दि.5) जुलै रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला समाजातील नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती यांनी केले आहे.
या बैठकीमध्ये विविध कार्यक्रमांच्या बाबतीत चर्चा  करण्यात येणार आहे. यामध्ये नियोजन समित्या, वक्त्यांची व्याख्याने, सांस्कृति संगीत रजणी, मिरवणूक नियोजन या  कार्यक्रमांसह आदी कार्यक्रमांची रूपरेषा ठरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्या-त्या दिवसाच्या नविन कार्यक्रम समित्याही निवडल्या जाणार आहेत. तरी या महत्वपूर्ण बैठकीस सर्व बहूजन समाजातिल नागरिक, नेते, कार्यकर्ते, कर्मचारी, विविध क्षेत्रातील सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या नियोजन बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समिती 2023 यांनी केले आहे.

COMMENTS