अण्णाभाऊ मार्क्सवादी की, आंबेडकरवादी?

Homeताज्या बातम्यासंपादकीय

अण्णाभाऊ मार्क्सवादी की, आंबेडकरवादी?

अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांबद्दल आणि साहित्याबद्दल त्यांच्या अनुयायांना जुजबी माहिती आहे हे सत्य. वास्तवातील चळवळीचा आणि अण्णाभाऊ साठे यांच्या विचा

आता हमीभावासाठी शेतकर्‍यांचा लढा
निवडणूकीच्या आचार संहितेमुळे आयोगच तणावाखाली
जनतेच्या प्रश्‍नांचे काय ?

अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांबद्दल आणि साहित्याबद्दल त्यांच्या अनुयायांना जुजबी माहिती आहे हे सत्य. वास्तवातील चळवळीचा आणि अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा विचार केल्यास सुरु असलेल्या चळवळी विचारावर चालल्या आहेत का? हा खरा प्रश्न. याला फुले- आंबेडकर चळवळी अपवाद नाही.  अण्णाभाउंनी मराठी साहित्यातील लोकवाङमय, कथा, नाट्य, लोकनात्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले. तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम अण्णाभाऊंनी केले. पोवाडे, लावण्या, गीतं, पदं या काव्यप्रकारांचा त्यांनी सामान्य जनतेसाठी वापर केला. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये अण्णाभाऊंनी शाहिरीतून दिलेले योगदान क्रांतिकारी. १९४४ ला त्यांनी `लाल बावटा` पथक स्थापन केले आणि बघता बघता ते शाहीर झाले. `माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होतीया काह्यली।।`ही त्यांची गाजलेली लावणी. अण्णाभाउंनी छत्रपती शिवरायांचे चरित्र रशिया पर्यंत पोवाड्यातून सांगितले. काही दिवसांनी त्याचे रशियन भाषेमध्ये भाषांतर झाले आणि राष्ट्रध्यशक्षांकडून त्यांचा सन्मान देखील झाला. १६ ऑगष्ट १९४७ साली “ये आझादी जुठी हे देश कि जनता भुकी हे” असा नारा शिवाजी पार्क वर दिला.  अण्णा भाऊंनी आपल्या लेखनकाळातील अल्पायुष्यात २१ कथासंग्रह आणि ३० पेक्षा अधिक कादंबऱ्याही लिहिल्या. त्यापकी सात कादंबऱ्यांवर मराठी चित्रपटही नामवंत दिग्दर्शकांनी काढले. ‘फकिरा’ या कादंबरीला १९६१ साली राज्य शासनाच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कारही मिळाला. तत्कालीन ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर यांनीही कादंबरीचे कौतुक केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या ‘फकिरा’मध्ये भीषण दुष्काळाच्या काळात ब्रिटिशांचे खजिने, धान्य लुटून गरिबांना, दलितांना वाटप करणाऱ्या फकिरा या  मांग समाजातील लढाऊ तरुणाचे चित्रण अण्णाभाऊंनी केले. ‘वैजयंता’ कादंबरीत प्रथमच तमाशात काम करणाऱ्या कलावंत स्त्रियांच्या शोषणाचे चित्रण केले. ‘माकडीचा माळ’ ही भटक्या-विमुक्त समाजाच्या जीवनपद्धतीचे अतिशय सूक्ष्म चित्रण करणारी भारतीय साहित्यातील पहिली कादंबरी. कोळसेवाला, घरगडी, खाण कामगार, डोअर किपर, हमाल, रंग कामगार, मजूर, तमाशातला सोंगाड्या अशा विविध भूमिका अण्णांनी केल्या.
जग बदल घालुनी घाव । सांगून गेले मला भीमराव ।।
हे त्यांचे एक प्रसिद्ध गीत. यात घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख करत ” सांगून गेले मला भीमराव ” असं ते म्हणतात. बाबासाहेबांचा समग्र लढा हा मानवमुक्तीचा लढा आहे. याचा विरोधाभास हा की, या देशात मानव गुलाम होता. त्या गुलामीच्या बेड्या घटनाकारांनी तोडल्या. म्हणून या गीताच्या माध्यमातून अण्णाभाऊ यांना सुद्धा हे जग बदलायचे आहे, असा संदेश ते देतात. मग प्रश्न पडतो की, अण्णाभाऊ यांना हे जग का बदलायचे आहे? तर ते समतेच्या विचाराच्या प्रेरणेने पछाडलेले होते. त्यांना विषमता, गुलामी मान्य नव्हती. म्हणजे, अण्णाभाऊ साठे हे मानवमुक्तीच्या विचारांचे होते. म्हणजेच, ते बुद्ध, फुले, आंबेडकर विचारांचे होते. आता प्रश्न हा आहे की, जर अण्णाभाऊ यांना जग बदलणे अभिप्रेत होते तर आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करणाऱ्या त्यांच्या अनुयायांना हे जग बदलायचे आहे का? बदलायचे असेल तर त्यांच्या अनुयायांचा जग बदलण्याच्या दृष्टीने काय कृतिकार्यक्रम आहे? यावर विचार करणे गरजेचे.
 अण्णाभाऊ साठे, फुले- आंबेडकर यांच्या विचाराचे  स्वतः ला मानणाऱ्या अनुयायांनी आपली वाटचाल करावी ही अपेक्षा. अण्णाभाऊ हे फुले आंबेडकर विचाराचे होते असा उल्लेख वर आलेला आहे. काहींच्या मते ते मार्क्सवादी होते. हा तसा स्वतंत्र विषय. पण, मार्च १९५८ मध्ये मुंबईला महाराष्ट्र दलित साहित्य संमेलनाचे उदघाटक म्हणून अण्णाभाऊ साठे उपस्थित होते. तेव्हा आपल्या भाषणात ते म्हणाले होते की, ” हि पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून दलितांच्या तळहातावर तरलेली आहे”. या वाक्याची मोडतोड करून मर्सवाद्यांनी ” हि पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून कष्टकरी मजुरांच्या हातावर तरली आहे ” अशी घुसळण केली. म्हणजे, हे झाले ” शिवराय मुस्लिम विरोधी होते आणि बुद्ध विष्णूचा नववा अवतार ” असे म्हणण्यासारखे. असो, शेवटी अण्णाभाऊ हे बाबासाहेब- फुले यांच्या विचारापर्यंत येऊन पोहोचले होते हा त्यामागील सांगण्याचा प्रयत्न. 

COMMENTS