Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अण्णा भाऊ साठेंच्या घर नुतनीकरणासाठीआमदार रोहित पवारांनी दिले 15 लाख रूपये

जामखेड :साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचा प्रश्‍न कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी हाती घेतला आहे. स्मारकासाठी लागणार्‍या

 फिरत्या वैद्यकीय सेवेमुळे गोरगरीब घटकांचे आरोग्य सुदृढ – चांदगुडे महाराज
महात्मा बसवेश्‍वर आणि कर्मवीर अण्णा यांचे विचार रुजले पाहिजेत ः प्राचार्य शेळके
राष्ट्रीय स्पर्धेत एकलव्य तायक्वांदोच्या खेळाडूंचा डंका

जामखेड :साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचा प्रश्‍न कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी हाती घेतला आहे. स्मारकासाठी लागणार्‍या जागेचे भूसंपादन करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्याची पत्राद्वारे मागणी केली आहे. सरकार याकडे दुर्लक्ष करणार असेल तर पवार कुटुंब आणि कर्जत-जामखेड व महाराष्ट्रातील नागरिकांच्या सहकार्याने स्मारकासाठीची जागा घेण्यासाठी निधी उभारण्याची तयारीही त्यांनी दर्शवली. महापुरुष अभिवादन यात्रेच्या सांगता समारंभाच्या निमित्ताने आमदार रोहित पवार यांनी वाटेगाव येथे साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मस्थळाची नुकतीच पाहणी केली. यावेळी त्यांनी त्यांच्या वंशजांचीही भेट घेऊन संवाद साधला आणि राहत्या घराबद्दल माहिती घेतली. या घराची दूरवस्था झाल्याने त्यांनी या घराच्या नुतनीकरणासाठी स्थानिक कंत्राटदाराला स्वखर्चातून 15 लाख रुपये निधीही उपलब्ध करुन दिला आहे.

“लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी साहित्यक्षेत्रात आणि महाराष्ट्रासाठी दिलेलं योगदान हे अनन्यसाधारण असल्याने अशा महापुरुषांचं स्मारक लवकर होणं गरजेचं आहे. सरकारकडून विलंब होत असेल तर माझं कुटुंब, माझा कर्जत-जामखेड मतदारसंघ आणि महाराष्ट्रातील जनता स्मारकासाठी लागणारी जमीन खरेदीसाठी निधी उभा करु. अण्णाभाऊंच्या कुटुंबियांच्या घराचंही नूतनीकरण सुरु केलं असून त्यासाठी आणखी निधी लागला तरी तो आम्ही उपलब्ध करुन देऊ. कारण या महान व्यक्तींनी महाराष्ट्रासाठी जे कार्य केलं ते पाहता त्यांच्या कुटुंबियांची आपण कितीही सेवा केली तरी ती कमीच आहे.’’
रोहित पवार (आमदार, कर्जत-जामखेड

COMMENTS