Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्जत येथे ‘अण्णा भाऊ साठे’ साहित्य संमेलन

मिरजगाव : कर्जत तालुक्यातील बहुचर्चित ‘सत्यशोधक डॉ. अण्णा भाऊ साठे’ दुसरे ग्रामीण साहित्य संमेलन रविवारी (दि. ५ एप्रिल २०२६) कर्जत येथे आयोजित करण्यात आले आहे. कर्जत तालुका साहित्यप्रेमी मंडळ व दादा पाटील महाविद्यालय, कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन आयोजित करण्यात येत असून, त्यासंदर्भात नियोजन बैठक नुकतीच दादा पाटील महाविद्यालयाच्या कार्यालयात पार पडली. बैठकीस महाविद्यालयाचे प्राचार्य संजय नगरकर, परिषदेचे अध्यक्ष तानाजी डाडर, सचिव नवनाथ केंदळे, चंद्रकांत डोलारे, संजय शेलार, प्रा. विक्रम कांबळे, दत्ताभाऊ घोडके, विजय शिंदे, ॲड. नितीन लोंढे आदी उपस्थित होते. संमेलनात विविध क्षेत्रातील नामवंत कवी, साहित्यिक व विचारवंत सहभागी होणार असून साहित्य, सामाजिक कार्य, कृषी, कला आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. हे संमेलन दादा पाटील महाविद्यालयाच्या शारदाबाई पवार सभागृहात आयोजित करण्यात आले असल्याची माहिती परिषदेचे संस्थापक व अध्यक्ष तानाजी डाडर यांनी दिली. 

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची ‘कम्प्युटर सायन्स हॅकॅथॉन’ स्पर्धेत चमक
तृतीयपंथीयांकडून यल्लमादेवीचा भक्तिमय जागर; जगातील युद्धसंकट दूर करण्यासाठी देवीचरणी प्रार्थना
माळीवाडा वेस न पाडता तिचे जतन करावे; खा. लंके यांची केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

मिरजगाव : कर्जत तालुक्यातील बहुचर्चित ‘सत्यशोधक डॉ. अण्णा भाऊ साठे’ दुसरे ग्रामीण साहित्य संमेलन रविवारी (दि. ५ एप्रिल २०२६) कर्जत येथे आयोजित करण्यात आले आहे. कर्जत तालुका साहित्यप्रेमी मंडळ व दादा पाटील महाविद्यालय, कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन आयोजित करण्यात येत असून, त्यासंदर्भात नियोजन बैठक नुकतीच दादा पाटील महाविद्यालयाच्या कार्यालयात पार पडली.

बैठकीस महाविद्यालयाचे प्राचार्य संजय नगरकर, परिषदेचे अध्यक्ष तानाजी डाडर, सचिव नवनाथ केंदळे, चंद्रकांत डोलारे, संजय शेलार, प्रा. विक्रम कांबळे, दत्ताभाऊ घोडके, विजय शिंदे, ॲड. नितीन लोंढे आदी उपस्थित होते.

संमेलनात विविध क्षेत्रातील नामवंत कवी, साहित्यिक व विचारवंत सहभागी होणार असून साहित्य, सामाजिक कार्य, कृषी, कला आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. हे संमेलन दादा पाटील महाविद्यालयाच्या शारदाबाई पवार सभागृहात आयोजित करण्यात आले असल्याची माहिती परिषदेचे संस्थापक व अध्यक्ष तानाजी डाडर यांनी दिली. 

COMMENTS