Homeताज्या बातम्यामनोरंजन

अंकिता-विक्कीचं लग्न धोक्यात

मुंबई प्रतिनिधी - अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा नवरा विक्की जैन हे कपल सध्या चर्चेत आहे. या चर्चेच कारण ठरलं आहे बिगबॉस 17 अंकिता आणि विक्

भारतीय निवडणूक प्रक्रियेचे परदेशी शिष्टमंडळाकडून कौतुक
आंबा साखर कारखाना येथे तपासणी शिबिर संपन्न
नाशिकच्या त्रिमूर्ती चौकात मराठा बांधवांचे बोंबाबोंब आंदोलन 

मुंबई प्रतिनिधी – अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा नवरा विक्की जैन हे कपल सध्या चर्चेत आहे. या चर्चेच कारण ठरलं आहे बिगबॉस 17 अंकिता आणि विक्की यांनी बिग बॉसच्या घरात पाऊल ठेवल्यापासून दोघांमध्ये सतत भांडणं सुरू आहेत. दोघांचं लग्न तुटेल इथपर्यंत भांडणं पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या घरात अंकिता आणि विक्कीची भांडणं सातत्यानं सुरू असतात. दरम्यान अंकिता ही टेलिव्हिजन अभिनेत्री असल्यानं विक्कीला देखील अंकिताचा नवरा म्हणून ओळखलं जातं. पण बिग बॉसच्या घरात आल्यापासून विक्की आपली वेगळी ओळख निर्माण करण्याच्या तयारीत आहे. या भांडणात दोघांचं लग्न धोक्यात आलंय असं दिसतंय. दोघे भांडताना नात्यातील अनेक गोष्टी बोलून जात आहेत. बिग बॉसच्या अपकमिंग एपिसोडमध्ये अंकिता आणि विक्की पुन्हा एकदा भांडताना दिसणार आहे. हे भांडणं जेवण बनवण्यावरून सुरू होणार आहे. एक प्रोमो समोर आला आहे ज्यात अंकिता किचनमध्ये जेवण बनवत आहे. पण तिथे असलेले काही जण तिला जेवण बनवण्यावरून टोकतात. हळद जास्त टाक, ओवा टाक असं म्हणत तिच्या जेवणात व्यत्यय आणत असतात. हे पाहून अंकिता चिडते आणि ‘तुम्ही बनवा’ असं म्हणते

COMMENTS