Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगावातील जनावरे बाजार सोमवारी बंद

कोपरगाव तालुका ः लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 करिता सोमवार 13 मे 2024 रोजी शिर्डी मतदार संघाकरिता मतदान होणार आहे. आपल्या देशाने लोकशाही पध्दती

सरपंच परमीटरूम, उपसरपंच हॉटेल नावाला हरकत : किरण अंत्रे यांची जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार
…त्यांनी नगरचा पांढरीपूल घाटच मानला माऊंट एव्हरेस्ट ; 38 तासात तब्बल 72 वेळा केली सायकलवर चढ-उतार, चौघांचा हॉल ऑफ फेममध्ये समावेश
वरशिंदेच्या उपसरपंचावर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा

कोपरगाव तालुका ः लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 करिता सोमवार 13 मे 2024 रोजी शिर्डी मतदार संघाकरिता मतदान होणार आहे. आपल्या देशाने लोकशाही पध्दती स्वीकारली असून 18 वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदान करणे अपेक्षित आहे. मतदानाच्या दिवशी सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क़ योग्य रितीने बजावता यावा व मतदानापासून कोणीही वंचित राहु नये. यासाठी सोमवार 13 मे रोजी कोपरगांव बाजार समिती मधील सर्व शेतीमालाचे खरेदी विक्रीचे व्यवहार तसेच जनावरे बाजार देखील बंद राहाणार याची सर्व शेतकरी, व्यापारी व बाजार घटकांनी नोंद घ्यावी अशी माहिती बाजार समितीचे सचिव  एन. एस. रणशूर यांनी दिली आहे.

COMMENTS