Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अनिल देशमुखांची तुरुंगातून सुटका

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला जल्लोष

मुंबई ः माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते आमदार अनिल देशमुख यांची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातून बुधवारी जामिनावर सुटका झाली आहे. यामुळे

अनिल देशमुखांची आज होणार सुटका
देशमुखांच्या मालमत्तांवर आयकर विभागाचे दुसर्‍या दिवशीही छापे
खोटी प्रतिज्ञापत्रे घेवून येणारा तो एनडीएचा पदाधिकारी

मुंबई ः माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते आमदार अनिल देशमुख यांची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातून बुधवारी जामिनावर सुटका झाली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते यामध्ये मोठे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अनिल देशमुख मुंबईच्या ऑर्थर रोड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.  

 अनिल देशमुख कारागृहातून बाहेर पडल्यानंतर ते वरळी येथील आपल्या सुखदा निवासस्थानी दाखल झाले होते. वरळी येथील त्यांच्या निवासस्थानाकडे जाणारा मार्ग व घराबाहेर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आल्याचे देखील पाहायला मिळत आहे. दरम्यान, अनिल देशमुख हिवाळी अधिवेशन कामकाजात सहभागी होणार नाही, अशी माहिती देखील समोर आली आहे. कोर्टाची मुंबई सोडण्याची परवानगी नसल्याने अधिवेशनात त्यांना सहभागी होता येणार नाही. दुसरीकडे हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाचे शेवटचे दोन दिवस बाकी आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना दरमहा 100 कोटी वसूलीचे आदेश दिले होते. या आरोपांची सीबीआय आणि ईडी तपास करत आहे. या प्रकरणात ऋषिकेश देशमुख देखील सक्रिय असल्याचा आरोप आहे.

दरम्यान, 13 महिन्यांच्या कालखंडानंतर कोणताही आरोप नसताना अनिल देशमुख यांची सुटका झाली. विशेष म्हणजे आरोपी असलेल्या व्यक्तीच्या जवाबाला विश्‍वासात घेऊन राज्याच्या गृहमंत्र्यांना अटक करण्याचे काम झाले असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. अनिल देशमुख यांच्यावर अजूनही कोणताही आरोप सिद्ध नाही. 100 कोटीचा आरोप शेवटी एक कोटी रुपयांवर येऊन थांबला. आज कोणताही आरोप सिद्ध होत नाही, हे कळल्यानंतर न्यायालयानं अनिल देशमुख यांना सोडा असे आदेश दिले. सीबीआयनं अनिल देशमुख यांची अटक वाढावी, यासाठी निकराचे प्रयत्न केले असल्याची टीकाही जयंत पाटील यांनी केली.

COMMENTS